Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 06:37 PM2024-10-30T18:37:33+5:302024-10-30T18:41:33+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : फहाद अहमद यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली होती, यावर आता त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar's candidate's application rejected? Fahad Ahmed disclosed | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : अजित पवार गटात गेलेल्या नवाब मलिक यांच्या मुलीच्या विरोधातही शरद पवार यांनी उमेदवार दिला आहे. बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे आज अर्ज छाननीमध्ये फहाद अहमद यांचा अर्ज बाद झाल्याची बातमी समोर आली होती. यावर आता त्यांनी स्वत: खुलासा केला आहे. 

"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान

माध्यांसोबत बोलताना फहाद अहमद यांनी खुलासा केला आहे. फहाद अहमद म्हणाले, माझ्या अॅफिडेव्हीटमध्ये चूक होती ही चुकीची बातमी होती. ही बातमी कोणी पसरवली याची माहिती आम्हाला आहे. ज्याने चुकीची बातमी पसरवली त्याला उत्तर मिळाले आहे. आम्ही अॅफिडेव्हीट बरोबर सादर केले होते. ते त्यांनी स्विकारले आहे. मी गरीब आहे मान्य आहे. आजची ही सर्वात मोठा विजय असल्याचा मानतो. मी या ठिकाणावरुन हलणार नाही. मी काम करत राहणार, असंही अहमद म्हणाले. 

" काही लोक माझ्याबाबत चुकीची बातमी पसरवत आहेत. माझ उच्चशिक्षण झाल्यामुळे शरद पवार यांनी मला उमेदवारी दिली. मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो. माझ्या बाबतीत ज्याने अशी बातमी पसरवली त्यांचे आभार त्यांच्यामुळे माझ्यासाठी अणुशक्तीनगरमध्ये लोक प्रार्थना करत होते, असंही अहमद म्हणाले. 

सना मलिक यांच्याविरोधात होणार लढत

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक शेख यांना तिकीट दिले आहे. सना मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायर ब्रँड लीडर आणि प्रवक्त्या आहेत. सना मलिक ही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची मुलगी आहे. सना मलिक अणुशक्ती नगर विधानसभेत सतत सक्रिय असतात. या मतदारसंघातही त्यांचा मोठा दबदबा आहे. त्या अनेकदा लोकांपर्यंत समस्या जाणून घेत आल्या आहेत. मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा नवाब मलिक यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच अजित पवारांनी सना मलिक यांना तिकीट दिले आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar's candidate's application rejected? Fahad Ahmed disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.