अजित पवारांच्या प्रश्नानं आरोग्यमंत्री सावंतांची भंबेरी उडाली; सरकारची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:05 PM2022-08-18T13:05:54+5:302022-08-18T13:06:24+5:30

Maharashtra Vidhan Sabha Live: पालघर जिल्ह्यातल्या हत्तीरोग प्रादुर्भाव नियंत्रणासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास एकनाथ शिंदे सरकारचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत असमर्थ ठरले.

Maharashtra Vidhan Sabha Live: Opposition Leader Ajit Pawar's question but Health Minister Tanaji Sawant not given answer to him | अजित पवारांच्या प्रश्नानं आरोग्यमंत्री सावंतांची भंबेरी उडाली; सरकारची नामुष्की

अजित पवारांच्या प्रश्नानं आरोग्यमंत्री सावंतांची भंबेरी उडाली; सरकारची नामुष्की

googlenewsNext

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने त्यांची भंबेरी उडाली. शिंदे सरकारच्या कारकिर्दीत अधिवेशनात पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे. 

पालघर जिल्ह्यातल्या हत्तीरोग प्रादुर्भाव नियंत्रणासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास एकनाथ शिंदे सरकारचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत असमर्थ ठरले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. 

ही माहिती आरोग्यमंत्री सावंतांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला. शिंदे सरकारला विचारलेला पहिलाच प्रश्न राखून ठेवावा लागला. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत याकडे लक्ष वेधले. 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. हत्तीरोग नियंत्रण यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, त्यापैकी भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंक उपाययोजनांसाठी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर निधी व वर्षभरात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवापर्यंत पुढे ढकलण्यात आला.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Live: Opposition Leader Ajit Pawar's question but Health Minister Tanaji Sawant not given answer to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.