साताराः विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. पायाला जखमा असतानाही वयाच्या 80व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे आणि उदयनराजेंना पराभव पाहावा लागला.राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा 87,717 मतांनी पराभव केला, श्रीनिवास पाटील यांना 636620 एवढी मतं मिळाली असून, भाजपाच्या उदयनराजेंना 548903 एवढं मताधिक्य मिळालं आहे. शरद पवारांनी या विजयावर सूचक प्रतिक्रिया दिली होती. मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला ही घोषणा यशस्वी ठरल्याचं सांगत पवारांनी सातारकरांचे आभार मानले. आता उदयनराजेंनीही पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : साताऱ्यातील पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 9:12 AM