Join us

महाराष्ट्र निवडणूक निकाल : मुंबईत कोण आघाडीवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:04 AM

Maharashtra Election Result 2019: आदित्य ठाकरे यांनी आघाडीवर आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या मतदारसंघांचे निकाल हाती येत असून आदित्य ठाकरे, विश्वनाथ महाडेश्वर, नवाब मलिक यासारख्या उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. 

आदित्य ठाकरे 19354 मतांनी आघाडीवर आहेत. दादर-माहिम मतदार संघात दुसरी फेरीअखेर शिवसेनेचे सदा सरवणकर आघाडीवर आहेत.  त्यांच्याविरोधात असलेले मनसेचे उमेवार संदीप देशपांडे पिछाडीवर आहे. तर, घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांची जागा चर्चेत होती. अपेक्षेप्रमाणे भाजपाचे राम कदम आघाडीवर आहेत. 

आघाडीवर असलेले उमेदवार...दहिसर – मनिषा चौधरी (भाजपा)मागाठणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना)मुलुंड – मिहीर कोटेचा (भाजपा)विक्रोळी – सुनील राऊत (शिवसेना)भांडुप पश्चिम – सुरेश कोपरकर (काँग्रेस)जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर (शिवसेना)दिंडोशी – सुनिल प्रभू (शिवसेना)कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर (भाजपा)चारकोप – योगेश सागर (भाजपा)मालाड पश्चिम – अस्लम शेख (काँग्रेस)गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजपा)घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजपा)घाटकोपर पूर्व – पराग शहा (भाजपा)मानखुर्द शिवाजी नगर – अबू आझमी (समाजवादी पक्ष)अणुशक्तीनगर – नवाब मलिक (राष्ट्रवादी)कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)वांद्रे पूर्व – विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) / तृप्ती सावंत (अपक्ष- सेना बंडखोर) पिछाडीवरवांद्रे पश्चिम – आशिष शेलार (भाजपा)धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)सायन कोळीवाडा – कॅप्टन तामिळ सेलवन (भाजपा)वडाळा – कालिदास कोळमकर (भाजपा)माहिम – सदा सरवणकर (शिवसेना) / संदीप देशपांडे (मनसे) पिछाडीवरवरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना)शिवडी – अजय चौधरी (शिवसेना)मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ (शिवसेना)कुलाबा – राहुल नार्वेकर (भाजपा) / भाई जगताप (काँग्रेस) पिछाडीवरकलिना –भायखळा –मलबार हिल –चेंबूर – प्रकाश फातरपेकर (शिवसेना)वर्सोवा -अंधेरी पश्चिम –अंधेरी पूर्व –विलेपार्ले –चांदिवली –

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबईवरळीघाटकोपर पूर्वमाहीमभाजपाशिवसेनाकाँग्रेसमनसे