Live: योग्य कार्यवाही करू; भाजपच्या निलंबित आमदारांना राज्यपाल कोश्यारींचं आश्वासन

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:55 AM2021-07-05T09:55:51+5:302021-07-05T19:27:39+5:30

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विधेयके हे कामकाज मुख्यत्वे यावेळी असेल. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे.

Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Monsoon Session Live updates | Live: योग्य कार्यवाही करू; भाजपच्या निलंबित आमदारांना राज्यपाल कोश्यारींचं आश्वासन

Live: योग्य कार्यवाही करू; भाजपच्या निलंबित आमदारांना राज्यपाल कोश्यारींचं आश्वासन

Next

राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची महाविकास आघाडी सरकारने केलेली तयारी बघता अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन् गदारोळाचेच वातावरण असेल, असे चित्र आहे. 

LIVE

Get Latest Updates

06:08 PM

भाजपचे १२ निलंबित आमदार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीसाठी राजभवनात

05:16 PM

राज्य सरकारकडून नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम- प्रवीण दरेकर

या सरकारला कोणत्याही विषयावर चर्चा नको. मराठा आरक्षणावर चर्चा नको, ओबीसी राजकीय आरक्षणावर चर्चा नको. आज एमपीएससीचे प्रश्न प्रलंबित आहेत. MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुणे येथे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. आज विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. या सर्व असंतोषाला वाचा फोडण्याचे काम भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष म्हणून करत आहे. त्यामुळेच नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

04:21 PM

आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी सरकारनं स्टोरी रचली- देवेंद्र फडणवीस

आमचे आमदार निलंबित करण्यासाठी एक स्टोरी तयार करण्यात आली होती. त्यानुसार आमच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं. आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ केली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेच्या सदस्यांनीच धक्काबुक्की दिली. त्यावर भाजपचे आमदार आक्रमक झाले. आमच्या आक्रमक आमदारांना आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. उलट आशिष शेलार यांनी या सर्व आमदारांच्या वतीने अध्यक्षांची माफी मागितली, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

03:40 PM

आमदारकी गेली तर चालेल; रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील- भाजप नेते राम सातपुते

आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही- भाजपचे निलंबित आमदार राम सातपुते

03:25 PM

लोकसेवा आयोगासाठी 43 वर्षे वयोमर्यादा

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी 43 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल. 

03:21 PM

106 आमदार पणाला लावू - फडणवीस

ओबीसी आरक्षणासाठी १२ काय १०६ आमदारही पणाला लावू , अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव संमत झाला आहे. त्यानंतर, फडणवीसांनी भूमिका मांडली. 

02:58 PM

शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई

तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर 1 वर्षे निलंबनाची कारवाई.

१. संजय कुटे
२. आशिष शेलार
३. गिरीश महाजन
४. पराग अळवणी
५. राम सातपुते
६. अतुल भातखळकर
७. जयकुमार रावल
८. हरीश पिंपळे
९. योगेश सागर
१०. नारायण कुचे
११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया
१२. अभिमन्यू पवार

या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

02:46 PM

शिवसेना आणि भाजपा आमदारांची बाचाबाची

शिवसेना आमदार आणि इकडच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली होती. आम्ही रागात होतो, अध्यक्ष महोदय हे जरुर खरं आहे, तेथे बाचाबाची झाली. आम्ही त्याचठिकाणी आम्ही तुमची माफी मागितली. त्यामुळे, यासंदर्भात विरोधकांना बोलावून आमच्याशी चर्चा करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, जाणून बुजून विरोधकांच्या सदस्यांची संख्या कमी करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असेही फडणवीस म्हणाले.  
 

02:42 PM

महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासली

सभागृहात आज जे घडलं ते लांछनास्पद, महाराष्ट्राला परंपरेला काळिमा फासणारं आहे. काही विधानसभा सदस्यांनी मला आई-बहिणीवर शिव्या दिल्या. मी कुणालाही शिवीगाळ केली नाही, सीसीटीव्ही फुटेजवरुन याचा तपास करायला हवाच, असे हंगामी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटले.  
 

02:38 PM

विधानसभेत राडा, भाजप आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला आहे. परंतु, विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. 

01:08 PM

राज्य सरकारचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा - फडणवीस

12:57 PM

ओबीसी मुद्द्याचा ठराव सभागृहात संमत, अध्यक्षांकडून घोषणा

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचा ठराव सभागृहात संमत करण्यात आला आहे, या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात चांगलाच गोधळ घातला. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना इशारा देत ठराव संमत झाल्याची घोषणा केली. 

12:33 PM

15 महिन्यापूर्वीच सरकारने निर्देश द्यायला हवे होते

आम्ही 15 महिन्यांचा वेळ दिला होता, या 15 महिन्यात मागासवर्ग आयोग तयार करुन डेटा उपलब्ध तयार करायचा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाने हा डेटा जमा करायचा आहे. जो आदेश सरकारने परवा काढला, तो 15 महिन्यांपूर्वीच काढायला हवा होता, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

12:28 PM

छगन भुजबळांनी अर्धसत्य सांगितलंय - फडणवीस

विधानसभेत ओबीसींच्या आरक्षणावरुन गदारोळ. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. मंत्री छगन भुजबळ यांनी बाजू मांडताना केंद्र सरकारकडून इम्पेरील डेटा न मिळाल्याचं सांगितलं. यावरुन देवेंद्र फडणवीस आपली बाजू मांडत असून छगन भुजबळ यांनी अर्धसत्य सांगितल्याचं म्हटलं आहे. 

12:15 PM

अब्दुल सत्तारांविरुद्ध महिलांचे आंदोलन

मुंबईत अब्दुल सत्तारांविरुद्ध महिलांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

11:50 AM

आमदार प्रताप सरनाईक विधानभवनात दाखल

शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक हे विधानभवनात दाखल झाले आहेत. ईडीकडून चौकशी सुरू असल्यापासून प्रताप सरनाईक हे मीडियापासून आणि सार्वजनिक जीवनातून दूर होते. मात्र, आज विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते सभागृहात आले आहेत. 

11:44 AM

31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागा भरणार - पवार

३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली

11:41 AM

तातडीने भरती करण्यासाठी सरकार आग्रही - उपमुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री एमपीएससी परीक्षेतील तातडीच्या भरतीसाठी आग्रही आहेत, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करावे लागते. त्यामुळे सरकार न्यायालयाच्या निर्देशानुसार मार्ग काढून लवकरच ही भरती पूर्ण करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले

11:35 AM

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांस 50 लाखांची मदत द्या

एमपीएससी परीक्षेतील उमेदवार स्वप्नील लोणकर यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यावरुन, सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुपल्याचे पाहायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. 

11:12 AM

सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं

सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

11:09 AM

सरकारचा मनमानी कारभार सुरू

सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू, आजच ते पास करू, असा कारभार रेटून नेणं योग्य नाही. सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही जनतेत जाऊ - देवेंद्र फडणवीस

11:09 AM

गडकरींच्या कारखान्यासंदर्भातील तक्रारीवर पाटील म्हणतात

नितीन गडकरींनी घेतलेले साखर कारखाने हे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने घेतले आहेत. याबाबत स्वत: नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिले आहे. ते नेहमीच चौकशीला खुल्या मनाने तयार असतात. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून 52-53 पैकी नितीन गडकरी यांच्याच दोन कारखान्याचे नाव टीव्हीवर दाखवून अनेक मुद्द्यांना बगल दिली जात आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

11:05 AM

भाजपा आमदारांचं पायऱ्यावर आंदोलन, फडणवीसही दाखल

भाजपा आमदार विधानभवनातील पायऱ्यावर बसून आंदोलन करत आहेत, त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत

11:01 AM

मुख्यमंत्री विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. दुसरीकडे भाजपा नेते विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधात घोषणाबाजी करत आहेत. 

10:55 AM

भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू - मलिक

राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आमदारांसह नेतेमंडळी सभागृहात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नितीन गडकरी यांच्या कारखान्यावरील कारवाईच्या मागणीवरुन भाजपला टोला लागवला आहे. भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं ते म्हणाले. तसेच भाजपामधील एका गटाकडून गडकरींना लक्ष्य केलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Monsoon Session Live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.