महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन LIVE: विरोधकांप्रमाणे खालच्या पातळीचं राजकारण करणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:20 AM2021-07-06T10:20:34+5:302021-07-06T17:44:42+5:30
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे, अधिवेशनचा दुसरा दिवसही लक्षवेधी ठरणार आहे.
विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.
अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आमदारांच्या निलंबनासह, शेतकरी, लसीकरण, कोरोना लॉकडाऊन यांसह विविध मुद्द्यावर आज चर्चा झडणार आहे.
LIVE
04:01 PM
विधिमंडळाचं पुढील अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार
विधिमंडळाचं पुढील अधिवेशन ७ डिसेंबरला नागपुरात होणार https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021
04:01 PM
विधिमंडळाचं पुढील अधिवेशन ७ डिसेंबरला नागपुरात होणार
03:06 PM
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष अधिवेशन
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष अधिवेशनाची शक्यता, नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी विशेष अधिवेशन बोलावले जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
12:59 PM
कंपन्यांनी कोणतं लॉलिपॉप दिलं - फडणवीस
देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. पीक विमा कंपन्यांना होणाऱ्या फायद्याची आकडेवारीच त्यांनी प्रति विधानसभेत वाचून दाखवली. तसेच, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कंपन्याना फायदा का करून देत आहात. कंपन्यांनी कोणतं लॉलिपॉप दिलं, असा सवालही फडणवीसांनी राज्य सरकारला केला आहे.
12:49 PM
15 हजार रिक्त पदे भरण्यास मंजुरी
राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
12:20 PM
फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार - गृहमंत्री
काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा गंभीर आरोप केला होता. त्यासंदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकराची उच्चस्तरीय चौकशीची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच, याप्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
12:02 PM
मार्शल पाठवून आणीबाणी लादण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
सरकारने मार्शल पाठवून प्रसारमाध्यमांना हाकलून दिले, सदस्यांचा माईक बंद करुन प्रति विधानसभेवरही बंदी घालण्यात आली. राज्य सरकार एकप्रकारे आणीबाणी लावत आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, आम्ही प्रेस रुममध्ये आता प्रति विधानसभा चालवणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटले.
11:52 AM
प्रति विधानसभेतील माईक बंद करा - भास्कर जाधव
भाजपाने सभागृहाबाहेर भरवलेल्या प्रति विधानसभेवर बंदी घालण्यात आली आहे. येथील माईक बंद करुन लाईव्ह चित्रीकरणही बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले आहेत.
11:41 AM
माझा कोड अमजद खान ठेवला - नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. पाळत ठेवण्यासाठी माझे फोन टॅप करण्यात आले असून माझा कोडवर्ड अमजद खान हा ठेवण्यात आला होता, अशी माहिती नाना पटोले यांनी विधानसभेत दिली. तसेच तुमचा अनिल देशमुख करू, तुमचा भुजबळ करू, अशी धमकी भास्कर जाधव यांना दिल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.
11:37 AM
कालिदास कोळंबकर बनले प्रति विधानसभेचे अध्यक्ष
भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाने आज सभागृहात न जाता पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा भरविली आहे. @BJP4Maharashtra#BJP#12MLA#Vidhansabhahttps://t.co/oGNtmZVJd6
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021
11:20 AM
सभागृहाबाहेरच भाजपाने भरवली प्रति विधानसभा
सभागृहात विरोधकांची दडपशाही म्हणून अभिरूप विधानसभा: विधान भवन मुंबई येथून.... #MonsoonSessionhttps://t.co/va4qBQAcqh
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 6, 2021
10:49 AM
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप आक्रमक
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप आक्रमक; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आमदारांची महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/NkLNYbpOAm
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021
10:32 AM
12 आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग - राऊत
मुंबई - विधानसभेच्या इतिहासात अशाप्रकारे वर्तन कधीच झालं नव्हतं, 12 आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग. विरोधकांच्या हातातच बॉम्बचा स्फोट झाला - संजय राऊत pic.twitter.com/5PLGJAwW0J
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021