मुंबई: राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारचा खातेवाटपावरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. या खातेवाटपाची यादी अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाली नाही. मात्र, या सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांची खातेवाटपाची यादी निश्चित झाली असून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची खातेवाटपाची ही संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती लागली आहे.
या यादीनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला वित्त व नियोजन, जलसंपदा, गृह, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला महसूल, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, उर्जा अशी खाती आली आहेत. मात्र, शिवसेनेकडून अद्याप खाते वाटपाची यादी जाहीर करण्यात आली नाही. 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तारात 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र त्यानंतरही खातेवाटप जाहीर न झाल्याने आघाडीत खात्यांवरून वाद असल्याची चर्चा सुरू होती.
राष्ट्रवादी खातेवाटपाची यादी१. अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)२. जयंत पाटील - जलसंपदा३. छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा४. अनिल देशमुख - गृह५. दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास६. धनंजय मुंडे - सामाजिक न्याय ७. हसन मुश्रीफ - ग्रामविकास८. बाळासाहेब पाटील - सहकार व पणन९. राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन १०. राजेश टोपे - आरोग्य ११. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण १२. नवाब मलिक - कामगार, अल्पसंख्याक विकास
काँग्रेस खातेवाटपाची यादी१. बाळासाहेब थोरात महसूल२. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम३. के सी पाडवी - आदिवासी विकास४. विजय वड्डेटीवार - ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन५. यशोमती ठाकूर - महिला बालविकास६. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण ७. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य८. सुनिल केदार - क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन, दुग्धविकास ९. अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे१०. नितीन राऊत - ऊर्जा
राज्यमंत्री (काँग्रेस):बंटी पाटील - गृह, गृहनिर्माणविश्वजीत कदम - सहकार, कृषी