Join us

गंभीर आजारग्रस्त लोकांच्या तक्रारींना महारेरा देणार प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

मुंबई : गंभीर जीवघेणा आजार असलेल्या तक्रारदारांच्या तक्रारींना आता महारेरा प्राधान्य देणार आहे. याबाबतीत महारेराने नुकतेच एक परिपत्रक जारी ...

मुंबई : गंभीर जीवघेणा आजार असलेल्या तक्रारदारांच्या तक्रारींना आता महारेरा प्राधान्य देणार आहे. याबाबतीत महारेराने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये तक्रारींचे प्राधान्य निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण स्थापन करण्यासाठी हा रेरा कायदा बनविण्यात आला आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण आणि त्वरित विवाद निवारणासाठी यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. कायद्यानुसार कोणतीही पीडित व्यक्ती कायद्यातील तरतुदींचे व नियमांचे उल्लंघन केल्यास महारेराकडे तक्रार करू शकते.

यात सभापतींना दिशानिर्देशांचा अधिकार दिला जातो.

महारेराकडे तक्रार दाखल केल्यानंतर, त्या तक्रारीच्या वरिष्ठतेनुसार आणि गुणवत्तेनुसार त्याचा निपटारा लवकरात लवकर होणे आवश्यक असते.

नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, तक्रारदारास एखादा गंभीर जीवघेणा आजार असल्यास, त्याने डॉक्टर प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावा. त्यामुळे त्याच्या तक्रारीला प्राधान्य दिले जाणार आहे. हा निर्णय अत्यंत कृतिशील असून, अनेकांना यामुळे फायदा होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.