Join us

महाराष्ट्र दुश्मनांपुढे झुकणार नाही, वाकणार नाही; कायम लढत राहील- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:35 AM

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुश्मनांना एकच धडा चारशे वर्षांपूर्वी घडवून ...

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुश्मनांना एकच धडा चारशे वर्षांपूर्वी घडवून दिला. महाराष्ट्र दुश्मनांपुढे झुकणार नाही. वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, स्वाभिमानासाठी हक्कांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि जर दुश्मन अंगावरती आला, त्याची बोटे छाटली जातील. प्रतापगडवर अफजल खानाचा कोथळा निघाला. पंचवीस वर्षे लढूनसुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये मृत्यू पत्करावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या दुश्मनांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे. शिवसेना खासकरून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांनी विचारातून प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय तपास यंत्रणेने आज दिल्लीमध्ये बोलवले आहे. त्याच्यावर चौकशीचे ससेमिरा सुरू आहे. महाराष्ट्रावर देखील ते सुरू आहे, पण बॅनर्जीने सांगितले आहे की, दिल्लीच्या सत्तेपढे झुकणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

टॅग्स :संजय राऊतमहाराष्ट्रभाजपा