'एकत्र राहिलो तर महाराष्ट्र जिंकू'; आगामी निवडणुकीवर जितेंद्र आव्हाड यांनी विश्वास केला व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 09:16 PM2023-04-29T21:16:25+5:302023-04-29T21:24:19+5:30
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीने पुढील निवडणुका एकत्र लढल्या तर चांगले यश मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे.
आज राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निकालांवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीने पुढील निवडणुका एकत्र लढल्या तर चांगले यश मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे.
APMC Election: बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश म्हणजे...; जयंत पाटलांची प्रतिक्रिया
आज बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री तथा आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्या ३५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढल्या.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन विश्वास व्यक्त केला आहे. "आज महाराष्ट्राच जनमत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा थोडीफार स्पष्ट झाली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका ह्या महाराष्ट्राचा कल कोणाच्या बाजूने आहे हे दर्शवीत असतात. आज झालेल्या निवडणूकांमध्ये सत्तर टक्के बाजार समित्या ह्या महाविकास आघाडीच्या हातात आल्या. नवीन नेतृत्व उभं राहायला वेळ लागत नाही. हाच याचा अर्थ आहे. एकत्र राहीलो तर महाराष्ट्र जिंकू, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
आज महाराष्ट्राच जनमत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा थोडीफार स्पष्ट झाली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका ह्या महाराष्ट्राचा कल कोणाच्या बाजूने आहे हे दर्शवीत असतात. आज झालेल्या निवडणूकांमध्ये सत्तर टक्के बाजार समित्या ह्या महाविकास आघाडीच्या हातात आल्या.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 29, 2023
नवीन…
"बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश"
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. गेल्या आठ - दहा महिन्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शिवाय बाजार समितीच्या निवडणुका अधिक किचकट करण्याचा प्रयत्न देखील शिंदे सरकारने केला. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी जनमत किती मोठे आहे हे दाखवून दिले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.