Join us

Maharashtra Winter Session 2022 : 'भास्करराव हे लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला...; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:48 PM

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली आहे, सुरुवातीपासूनच अधिवेशन वादळी ठरले आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली आहे, सुरुवातीपासूनच अधिवेशन वादळी ठरले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील आमदार भास्करराव जाधव यांच्यात सीमावादावरुन खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कर्नाटक समोर मान खाली घालून बसले आहे, असा आरोप आमदार भास्करराव जाधव यांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. 

'आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कर्नाटक समोर मान खाली घालून बसले आहे, आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री काय वाटेल ते आरोप करत आहेत, असा आरोप आमदार भास्करराव जाधव यांनी केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. 'भास्कराव जाधव तुम्ही हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल कुणाच्या बापाची हिम्मत नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

यावेळी सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला होता. आमदार भास्करराव जाधव यांनी सीमावादावरुन आपली भूमिका मांडली. 'राज्य सरकार आपल्या सीमावर्ती भागासाठी लढणार आहे, एक एक इंच जागा त्यांना देणार नाही, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

 "राज्यातील मंत्री 'जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्ये घ्यावा' असं म्हणतात हे दुर्दैवी"

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला केंद्रशासित प्रदेश घोषित करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली. विधानपरिषदेत सीमाप्रश्नावर नियम ९७ अंतर्गत अल्पकालीन चर्चेदरम्यान ते बोलत होते. राज्य शासनाने किंवा मराठी माणसाने किती वेळा कन्नड भाषिकांवर अत्याचार केले ? किती दिवस मराठी भाषिकांवर किती काळ अत्याचार होणार ? असे सवाल ठाकरे यांनी उपस्थित केले.

राज्यातील महत्वाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री दिल्लीत जाणे योग्य नाही. राज्यातील आताचे मंत्री 'जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्ये घ्यावा' असे म्हणतात ही दुर्दैवी बाब आहे. राजकारण बाजूला ठेऊन विधिमंडळाने आजच ठराव मांडावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभास्कर जाधव