नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
'उद्धव ठाकरे सभागृहात दिसत आहेत हे चांगले आहे. ते मागच्या आठवड्यात आले आणि शिवसेनेच्या कार्यालयात न जाता काँग्रेसच्या कार्यालयात गेले, अशी टीका शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
...तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा; उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी
कर्नाटक हे भारताचं राज्य आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला बंधनकारक मग कर्नाटकाला नाही का? सीमावादावर सर्व पक्ष कर्नाटकात एकत्रित उभे राहतात ते चित्र आपल्याकडे दिसत नाही. आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा असं म्हणतात मग न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार? आजच सीमावाद कसा पेटला? आपल्या आदर्शाचा अपमान महाराष्ट्रातच व्हायला लागला मग इतर सोडणार कसे? आज नाही तर कधीच नाही या जिद्दीने उभं राहायला हवं. सीमाभाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडींचा अत्याचार थांबलाच पाहिजे. संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने हाती घेऊन पालकत्व करावं असा ठराव आजच्या आजच झाला पाहिजे अशी मागणी विधान परिषदेत आमदार उद्धव ठाकरे यांनी केली.
Maharashtra Winter Session: ...तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा; उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी
विधान परिषदेत सीमावादावर ठराव मांडण्यात येणार असून त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सभागृहात सर्व सदस्यांचं एकमत झालं ही चांगली गोष्ट आहे. सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रात जायचंय त्यासाठी अनेक ठराव, प्रस्ताव मांडले. १९७० च्या दशकात महाराष्ट्र सरकारनं एक फिल्म बनवली होती. सीमाभागात मराठी भाषा कधीपासून अस्तित्वात आहे त्याचे पुरावे आहेत. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. जेणेकरून सीमावादाचा ठराव म्हणजे काय हे नवीन सदस्यांना कळू द्या असं त्यांनी सांगितले.