राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी गटातील सदस्यांनी केली आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरू आहे. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांसदर्भात अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे.
दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, यावेळी दालनात विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षातील सदस्य दालनात उतरले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे.
या संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सध्या बैठक सुरू आहे.
विधानसभेत गाजला AU मुद्दा!
एकीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत थेट ठाकरे गटावर हल्ला चढवला. तर दुसरीकडे आता हिवाळी अधिवेशनात भाजपा-शिंदे गटाने दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आणत आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
सभागृहात भरत गोगावले म्हणाले की, ९ जून २०२० ला दिशा सालियान युवतीचा संशयास्पद मृत्यू होणे. दिशाचा मृत्यू कुठल्या परिस्थितीत झाला? तपासात अद्याप निष्कर्षापासून पोहचले नाही. दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतचे काम सांभाळत होती. त्या दोघांमध्ये झालेला फोन संवाद, व्हॉट्सअप चॅट उघड न होणे. दिशा मृत्यूनंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होणे. या मृत्यूचे गुढ उकललं नाही. या प्रकरणी सत्य बाहेर येणे गरजेचा आहे. दिशा सालियानचा मृत्यूवेळी तिच्यासोबत कोण कोण होते? हे समोर यायला हवा. दिशा सालियानच्या मृत्यूशी पूर्णपणे चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणी खुलासा होणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं.