मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राज ठाकरे यांची काल राज्यातील नांदेडमध्ये पहिली सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणाचे एकप्रकारे कौतुक करत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष केले आहे. सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात 'चौकीदार चांगलाच ठोकला... राज ठाकरेंनी!' असे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, यासाठी राज्यात ठिकठिकाणी भाजपाविरोधातकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा प्रचारासाठी सभाही घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने एकप्रकारे आघाडीला साथ दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे शिवसेना-भाजपाकडून टीका होत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या नाऱ्याला प्रत्युतर देण्यासाठी भाजपाने 'मै भी चौकीदार' अशी मोहीम सुरु केली आहे. मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपाचे सर्वच नेते प्रचारसभेत आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगत आहे.
राज ठाकरेंच्या सभेने काँग्रेसला बळकटीपाच वर्षानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेल्या राज ठाकरे यांनी नांदेड मतदारसंघात भाजपाच्या अडचणी आणखीणच वाढविल्या आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या भाषणाचे पाच व्हिडीओही सादर केले. सभेला लोटलेला जनजागर आणि या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर केलेल्या घणाघाती टीकेमुळे ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेसला बळकटी मिळाली आहे.