Join us

कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 5:39 PM

कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत.

नवी दिल्ली -  कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहे. आमदारकीचा राजीनामा देणारे कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये वास्तव्यास असून, या हॉटेलबाहेर आज काँग्रेसच्या कार्यकत्यांनी  जोरदार निदर्शने केली. दरम्यान, या निदर्शनांप्रकरणी पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकत्यांना ताब्यात घेतले आहे.  कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी शनिवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. त्यानंतर हे आमदार बंगळुरू येथून निघून थेट मुंबईत आले होते. येथील सोफीटेल हॉटेलमध्ये सदर आमदार वास्तव्यास आहेत. दरम्यान, या आमदारांनी केलेल्या बंडखोरीविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या आमदारांविरोधात मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी सुरज सिंह ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय. शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत. 

टॅग्स :काँग्रेसमुंबईकर्नाटक राजकारण