महाराष्ट्राचे ५० मल्ल विजेतेपदासाठी सज्ज
By admin | Published: February 6, 2017 01:15 AM2017-02-06T01:15:11+5:302017-02-06T01:15:11+5:30
आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ५० सदस्यांचा महाराष्ट्र संघ निवडण्यात आला आहे. ८ ते १२ फेब्रुवारी रोजी आंध्रप्रदेश येथील चित्तुर येथे
मुंबई : आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ५० सदस्यांचा महाराष्ट्र संघ निवडण्यात आला आहे. ८ ते १२ फेब्रुवारी रोजी आंध्रप्रदेश येथील चित्तुर येथे रंगणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लांनी एकहाती दबदबा राखण्याचा निर्धार केला आहे.
नुकताच पुणे येथील राज्य कुस्ती केंद्रात सब ज्युनिअर फ्री स्टाईल व ग्रीको (मुले) आणि सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धा खेळवण्यात आली. फ्री-स्टाईल व ग्रीको स्पर्धेतील विजयी व उपविजयी अशा ४० मुलांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मुलींच्या गटातून १० मल्लांची फ्री स्टाईल गटासाठी निवड करण्यात आली.
सुरज यादव (६३ किलो), दुर्गेश यादव (८५ किलो), गोकुळ यादव (७६ किलो) या मुंबई उपनगरच्या कुस्तीपटूंची निवड झाली असून मुलींमध्ये मुंबई उपनगरच्या अमृताकुमारी यादव (३८ किलो)
व धनकला कुँवर (४० किलो) यांची
संघात वर्णी लागली आहे.