महारेराच्या काळ्या यादीत मुंबईतील १९९ प्रकल्पांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:08 AM2021-09-07T04:08:32+5:302021-09-07T04:08:32+5:30

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने नुकतीच २०२० आणि २०२१ मधील वेळेत बांधकाम पूर्ण न केलेल्या ...

Maharashtra's blacklist includes 199 projects in Mumbai | महारेराच्या काळ्या यादीत मुंबईतील १९९ प्रकल्पांचा समावेश

महारेराच्या काळ्या यादीत मुंबईतील १९९ प्रकल्पांचा समावेश

Next

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने नुकतीच २०२० आणि २०२१ मधील वेळेत बांधकाम पूर्ण न केलेल्या प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. या काळ्या यादीत मुंबईतील १९९ प्रकल्पांचा समावेश आहे. या यादीत समावेश असणाऱ्या विकासकांना आता त्यांच्या प्रकल्पांमधील घरांची विक्री करता येणार नाही. त्याचप्रमाणे जाहिरात, ऑफर यावरदेखील पूर्णपणे बंदी असणार आहे. बांधकाम प्रकल्पांमध्ये ग्राहकांना घरांचा ताबा देण्यास उशीर करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकून महारेराने मोठा दणका दिला आहे.

ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, जालना, जळगाव, धुळे, चंद्रपूर, बीड, औरंगाबाद, अमरावती, अकोला, अहमदनगर, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली, दादरा, नगर हवेली या जिल्ह्यांमधील अनेक प्रकल्पांचा यात समावेश आहे. यापूर्वी महारेराने २०१७, २०१८ व २०१९ वर्षांमधील काळ्या यादीतील प्रकल्पांची नावे जाहीर केली होती. त्यात मुंबईतील २४१ प्रकल्पांचा समावेश होता.

Web Title: Maharashtra's blacklist includes 199 projects in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.