जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील महाराष्ट्रीयन सेवाभावी संस्थांनी घ्यावी-निर्मलकुमार देशमुख

By मनोहर कुंभेजकर | Published: January 28, 2024 09:05 PM2024-01-28T21:05:20+5:302024-01-28T21:05:42+5:30

नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील 26 रत्ने सन्मानित

Maharashtrian charities in the state should take note of the social work of the Jain community - Nirmal Kumar Deshmukh | जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील महाराष्ट्रीयन सेवाभावी संस्थांनी घ्यावी-निर्मलकुमार देशमुख

जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील महाराष्ट्रीयन सेवाभावी संस्थांनी घ्यावी-निर्मलकुमार देशमुख

मुंबई- जैन समाजाची लोकसंख्या जरी कमी असली तरी त्यांच्या कडे 28 टक्के पैसा आहे.ही मंडळी खूप काम करतात. त्यांना जेव्हढे पैसे येतात तितके दुप्पट पैसे त्यांना देणगी म्हणून मिळतात.जसा जैन समाज हा समाज कार्यात अग्रेसर आहे,तसे चित्र महाराष्ट्रातील सेवाभावी संस्था मध्ये
दिसत नाही.जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील सेवाभावी संस्थांनी घ्यावी असे आवाहन
निवृत्त प्रशासकीय अधिकारी निर्मलकुमार देशमुख (आयएएस) यांनी आज दुपारी गोरेगावात केले.

या कार्यक्रमाला पंजाब-हरियाणाचे माजी न्यायमूर्ती व डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे चेअरमन अरुणकुमार चौधरी,मोहन राठोड ( निवृत्त आय पी एस ),कामगार नेते अभिजित राणे,मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर,उत्तर पश्चिम मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष क्लाव्हई डायस,निवड समिती पुरस्कार सोहळा अध्यक्ष इमरान राही,औषध निर्माणतज्ञ-व्याख्याते डॉ.महेश अभ्यंकर,नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट,आरे, गोरेगाव (पूर्व )  या सेवाभावी संस्थेच्या वतीने आज गोरेगाव (पूर्व ),भानुबेन नाणवटी कलाघर, नंदादीप शाळा, जयप्रकाश नगर येथे राजस्तरीय नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024  सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केले होते.सुमारे साडेतीन तास हा शानदार सोहळा रंगला होता.त्यावेळी ते बोलत होते.

महिलांच्या कथा आणि व्यथा समजून घेतल्या पाहिजेत त्यांना कशी मदत करायची त्याचा विचार करावा.सुनील कुमरे हा चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे. राजकारणातले चित्र वेगळे आहे. चांगले राजकारणात येत नाही अशी खंत देशमुख व्यक्त केली.तर मोहन राठोड ( निवृत्त आय पी एस ) यांनी सुनील कुमरे हे एक हार्ड कोर कार्यकर्ता आहे अश्या शब्दात त्यांचा गौरव केला.नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या सेवाभावी संस्थांचे इतर संस्थांनी अनुकरण करून महाराष्ट्रात अश्या संस्था वाढीस लागणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात सुनील कुमरे यांच्या कार्याचा गौरव केला.

माजी न्यायमूर्ती अरुणकुमार चौधरी म्हणाले की, मला अभिमान वाटतो की,कुमरे हा माझ्या वर्धा गावाचा आहे.पंजाब-हरियाणाचा न्यायमूर्ती असतांना  मानवतावादी दृष्टिकोन ठेवत व गुन्ह्यांची शहानिशा केल्यावर मी निष्पाप गुन्हेगारांना दोषमुक्त केले हा किस्सा त्यांनी सांगितला.

यावेळी नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील प्रशासकीय, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, कला, शैक्षणिक, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 26 जणांना गौरवशाल,सन्मानचिन्ह,मानपत्र,मेडल,तुळशीचे रोपटे देवून गौरवण्यात आले.

यामध्ये राजीव गायकवाड (नागपूर), सिध्दी मणेरीकर (मुंबई),  डॉ.इंद्रजीत खांडेकर (सेवाग्राम वर्धा), स्नेहा  कोकणे पाटील (नाशिक) ,पियू चौहान (मुंबई),सुनिता नागरे (मुंबई),सुप्रिया चव्हाण (मुंबई),डॉ महालक्ष्मी वानखेडकर (मुंबई),दत्ता शिरसाट (मुंबई),सुजाता  तावडे (मुंबई) ,शंकर बळी (मुंबई), सचिन कामतेकर (मुंबई) ,रंजना संखे (पालघर),शुजाउद्दीन शाहिद (मुंबई),प्राचार्य प्रकाश खंडार (वर्धा) , आरिफ पटेल (मुंबई) ,माही राठोड (मुंबई) ,फरहान हनीफ शेख (मुंबई), राहुल मोहन (नवी मुंबई),सुप्रिया चव्हाण (मुंबई)  ,डॉ जतीन वालिया( मुंबई) ,अँड जगदीश जायले (मुंबई) ,राजेश पवार (मुंबई) ,मुकुंदराव मसराम (वर्धा) ,किरण फुलझले (नागपूर), अशा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील प्रशासकीय, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, कला, शैक्षणिक, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  एकूण 26 जणांना गौरवशाल,सन्मानचिन्ह,मानपत्र,मेडल,तुळशीचे रोपटे देवून गौरवण्यात आले.

Web Title: Maharashtrian charities in the state should take note of the social work of the Jain community - Nirmal Kumar Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई