महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार हा कर्तबगारांचा गौरवसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:50 AM2018-04-12T01:50:39+5:302018-04-12T01:50:39+5:30
महाराष्ट्राच्या ११ कोटीपेक्षा अधिक जनतेतून ज्यांनी आपल्या कामाचा ठसा संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशावर उमटवला आहे अशा सर्व कर्तबगार बंधू - भगिनींना शोधून समाजासाठी, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी लोकमतपेक्षा महत्वाचे दुसरे व्यासपीठ असू शकत नाही.
मुंबई- महाराष्ट्राच्या ११ कोटीपेक्षा अधिक जनतेतून ज्यांनी आपल्या कामाचा ठसा संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशावर उमटवला आहे अशा सर्व कर्तबगार बंधू - भगिनींना शोधून समाजासाठी, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी लोकमतपेक्षा महत्वाचे दुसरे व्यासपीठ असू शकत नाही. गेली चार वर्षे या महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमधील मान्यवरांमध्ये या पुरस्कारामुळे नवीन चैतन्य आणि जिद्द निर्माण झाली आहे. या पुरस्कारासाठी असामान्य कर्तृत्व केलेल्यांना निवडणे जिकीरीचे काम होते. ज्युरींनी अहारोत्र काम करून उत्तमप्रकारे निवड केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करताना देश आणि राज्य पुढे नेण्यासाठी राजकीय शक्तीही तितकीच महत्वाची आहे. म्हणूनच होतकरू राजकारण्यांचाही सन्मान करण्यात आला आहे, असं लोकमत एडिटोरिल बोर्डाचे चेअरमन विजय दर्जा म्हणाले.
पुरस्कारांचा दर्जा हा उत्तम परीक्षक मंडळावर अवलंबून असतो. लोकमतच्या संपादकीय मंडळाने अत्यंत कष्टपूर्वक निवडलेल्या नामांकनांमधून पुरस्कारासाठी एकाची निवड करणे हे ज्युरीसमोर मोठे आव्हान होते. विविध क्षेत्रात किती मोठे काम सुरू आहे, याची जाणीव या पुरस्कराच्या निमित्ताने झाली.
- प्रसून जोशी
(अध्यक्ष, सेन्सॉर बोर्ड)
>पुरस्कारासाठी निवड करणे ही ज्युरींच्या दृष्टीने अत्यंत कठीण बाब होती. आम्ही चर्चा केली, वाद झाले, मतभेद झाले आणि शेवटी आम्ही एकमताने निवड केली.
- डॉ. भालचंद्र मुणगेकर
(माजी राज्यसभा सदस्य)