Join us

पद्मश्रीपेक्षा ‘महाराष्ट्रीयनचे’ मोल जास्त- डी. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:58 AM

लोकमतने दिलेल्या जीवनगौरव पुरस्काराचे मोल मला पद्मश्री पेक्षा जास्त आहे. या गौरवामुळे मी अत्यंत आनंदी असून हा पुरस्कार सोहळा माझ्या कायम स्मरणात राहील, असं प्रतिपादन शिक्षणमहर्षी व बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील यांनी केलं आहे.

मुंबई- लोकमतने दिलेल्या जीवनगौरव पुरस्काराचे मोल मला पद्मश्री पेक्षा जास्त आहे. या गौरवामुळे मी अत्यंत आनंदी असून हा पुरस्कार सोहळा माझ्या कायम स्मरणात राहील, असं प्रतिपादन शिक्षणमहर्षी व बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील यांनी केलं आहे. लोकमत जीवनगौरव पुरस्काराने शिक्षणमहर्षी व माजी राज्यपाल बिहार डि.वाय.पाटील यांना सन्मानित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत इतर मान्यवर. नावाला नाही, कामाला समर्थन दिले!> १२ वर्षे झाली राजकारणात आहे. आज माझ्या कामाची दखल घेतली गेली, याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या कामाला तुम्ही समर्थन दिले, त्याबाबत आभारी आहे. वडिलांची पुण्याई, आईचा आशीर्वाद, परिवाराची ताकद आणि कार्यकर्त्यांचे प्रेम असेल, तर सर्वकाही शक्य आहे.- खा. पूनम महाजन, राष्ट्रीय अध्यक्षा, भाजयुमो> हा पुरस्कार मिळाल्याचा खूपआनंद आहेच, मात्र यावेळी एक विशेष उल्लेख करावासा वाटतो. या मंचावर असताना ही संधी घेऊन मला समजून घेणाऱ्या घरच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो.-डॉ. मिलिंद कीर्तनेइएनटी तज्ञ, मुंबई>औरंगाबादसारख्या शहरातून उद्योगाला सुरूवात केली. अनेकांचे आशीर्वाद आणि मेहनतीच्या बळावर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. लोकमत पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अत्यानंद झाला आहे.- राहूल धूत, धूत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद>मूळ कन्नड भाषिक होतो. परंतु तिकीट तपासत, तपासत महाराष्ट्रात आलो आणि तिकीट कलेक्टर झालो. या मातीत इतकी शक्ती, इतकी प्रेरणा आणि शौर्य होते की आज जिल्हाधिकारी झालो. या पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढली आहे.-जी. श्रीकांतजिल्हाधिकारी, लातूर>अभिनव देशमुख ट्रेनिंगसाठी दक्षिणा कोरियामध्ये असल्याने आम्ही पुरस्कार स्वीकारत आहोत. गडचिरोलीतील प्रत्येक नागरिकाला आणि या नक्षलविरोधी कारवाईला प्रतिबंध करणा-या सर्व कर्मचा-यांना हा पुरस्कार जातो.-अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस प्रमुख, गडचिरोली>आकांक्षातर्फे तिच्या आईने पुरस्कार स्वीकारला. त्या म्हणाल्या की, आकांक्षासाठी मत देणाºया सर्व जनतेचे मी आभारी आहे. या पुरस्काराने आनंद तर झाला आहेच, शिवाय आता आणखी जबाबदारी वाढली आहे.-आकांक्षा हगवणे,बुद्धिबळ, पुणे>हा पुरस्कार प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या सीएमओ सोनाली धवन यांनी स्वीकारला. त्या म्हणाल्या भारतामध्ये सर्वांना १०० टक्के शिक्षण मिळावे असे फाऊंडेशनचे मूळ ध्येय आहे. लोकमतने केलेल्या गौरवामुळे आनंद होत आहे.- सीएसआर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, शिक्षण प्रकल्प-‘पढेगा इंडिया, बढेगा इंडिया’>जागतिक पातळीवर महाराष्ट्रातील मराठी मंडळी मोठ्या प्रमाणात काम करते. मात्र त्यांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच दखल घेतली गेली. हा पुरस्कार स्वीकारताना आनंद तर होतो आहेच शिवाय, यासाठी ‘लोकमत’चे आम्ही आभारी आहोत.-ग्लोबल टॉर्च बिअरर, मुकुंद नवाथे, महाराष्ट्र मंडळ, लंडन

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८देवेंद्र फडणवीस