मुंबई : स्थावर संपदा एजंटसनी 2017 साली मिळालेल्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही म्हणून महारेराने 13 हजार 785 एजंटसची नोंदणी रद्द केली आहे. या सर्व एजंटसची संकलित यादी महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या एजंटसना पुन्हा एजंटस म्हणून काम करायचे असल्यास विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही. यात मुंबई आणि मुंबई उपनगराचे 6291 असे सर्वात जास्त एजंटस असून त्यानंतर ठाणे 3075 आणि पुणे 2349 येथील एजंटसचा क्रमांक लागतो.
एकीकडे नुतनीकरणा अभावी अशी संख्या कमी होत असताना नवीन एजंटसही पात्र ठरले आहेत. एजंटससाठी विहित केलेली चौथी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात 1767 उमेदवार परीक्षेला बसले होते . त्यापैकी 1527 उमेदवार पात्र ठरले आहेत. 240 उमेदवार नापास झाले. या परीक्षेचा निकाल 86.41% टक्के लागला असून मुंबईतील आरोही चिराग भिमाजियानी ह्या 100% गुण मिळवून सर्वोत्तम ठरल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या 4 परीक्षांमध्ये 100 टक्के गुण मिळविणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत.
नोंदणी रद्द केलेल्या एजंटसची जिल्हानिहाय संख्या
मुंबई उपनगर 4353
ठाणे 3075
पुणे 2349
मुंबई शहर 1938
रायगड 770
पालघर 433
नागपूर 374
नाशिक 195
अमरावती 43
छ.संभाजीनगर 38
कोल्हापूर 30
अहमदनगर 21
रत्नागिरी 20
जळगाव ,सातारा प्रत्येकी 19
चंद्रपूर, सोलापूर प्रत्येकी 15
धुळे 12
सांगली 11
भंडारा 9
अकोला, सिंधुदुर्ग, वर्धा प्रत्येकी 7
जालना 6
गोंदिया 4
लातूर 3
बुलडाणा, दादरा नगर हवेली, नांदेड, यवतमाळ प्रत्येकी 2
हिंगोली,उस्मानाबाद, परभणी, वाशीम प्रत्येकी 1
एकूण 13, 785