Join us

मंत्रालयात अवतरले गांधीजी; १,३२६ रुबिक्स क्यूब्सचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:34 AM

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चक्क महात्मा गांधीजीच मंत्रालयात अवतरले. त्यांना मंत्रालयात आणण्याचे आव्हान पेलले ते व्हीजेटीआय महाविद्यालयातील ‘टेक्नोवान्झा’ फेस्टिव्हलच्या रुबिक्स क्यूब टीमने!

- सीमा महांगडेमुंबई  - यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चक्क महात्मा गांधीजीच मंत्रालयात अवतरले. त्यांना मंत्रालयात आणण्याचे आव्हान पेलले ते व्हीजेटीआय महाविद्यालयातील ‘टेक्नोवान्झा’ फेस्टिव्हलच्या रुबिक्स क्यूब टीमने! तब्ब्ल १,३२६ रुबिक्स क्यूब्सचा वापर करत १० जणांच्या टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गांधीजींची प्रतिकृती मंत्रालयात साकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते अधिकारी, यांच्याकडून या कलाकृतीचे विशेष कौतुक करण्यात आले.व्हीजेटीआयच्या ‘टेक्नोवान्झा’ या टेक्निकल फेस्टिव्हलमधील रुबिक्स क्यूब टीम ही क्युबिक आटर््सच्या कलाकृती उभारण्यात पारंगत आहे. ‘आम्ही साकारलेली ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची कलाकृती पाहून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, तुम्ही एखादी कलाकृती साकाराल का? अशी विचारणा आमच्या टीमला मुख्यमंत्री कार्यालयातून झाली. आम्ही महात्मा गांधीजींची प्रतिमा साकारण्याचा निर्णय घेतला,’ अशी माहिती या टीमचे सदस्य विनय काठोले याने दिली. गांधीजींच्या प्रतिकृतीच्या रंगाप्रमाणे क्युबिक्सच्या रंगांची निवड केल्याची माहितीही त्याने दिली.याआधीही या टीमने प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, रतन टाटा, नाना पाटेकर अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांचे क्युबआर्ट्स साकारले आहेत. या टीममध्ये विनय, आदित्य शेणॉय, वैशाली दात्रे, अमेय गुजर, वेदांग खंदारे, राणी देवरे आणि काही जणांचा समावेश असून त्यांना ही प्रतिकृती साकारण्यास दोन दिवस लागले. याआधी त्यांनी ती सॉफ्टवेअरच्या मदतीने पिक्सेल्समध्ये परावर्तित केली. नंतर त्याला उभ्या-आडव्या रांगांत विभागले. प्रत्येक सदस्यांकडून त्या पिक्सेलचा अचूक पॅटर्न क्युबवर तयार केला. शेवटी सगळे क्युब्स एकत्र करून एकत्रित प्रतिमा तयार केली. यासाठी या टीमला त्यांचे संचालक धीरेन पटेल यांचा पाठिंबा मिळाला.

टॅग्स :मंत्रालयमुंबई