'महाविकास आघाडी सरकार लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये, 5 वर्षे टिकेल असं वाटत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 01:14 PM2020-07-31T13:14:26+5:302020-07-31T13:18:44+5:30

राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत असून ज्या ताकदीने कोरोनाशी लढायला हवं, तितक्या ताकदीने राज्य सरकार कोरोनाशी लढत नाही.

'Mahavikas Aghadi government in live-in relationship, I don't think it will last for 5 years', devendra fadanvis | 'महाविकास आघाडी सरकार लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये, 5 वर्षे टिकेल असं वाटत नाही'

'महाविकास आघाडी सरकार लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये, 5 वर्षे टिकेल असं वाटत नाही'

Next
ठळक मुद्देराज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत असून ज्या ताकदीने कोरोनाशी लढायला हवं, तितक्या ताकदीने राज्य सरकार कोरोनाशी लढत नाही.

मुंबई - राज्यात सध्या पुण्या-मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यात कोरोनाचा आकडा १५ ऑगस्टपर्यंत उच्चांक गाठेल. सप्टेंबरमध्ये हळूहळू रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात होईल. यामुळे घाबरुन जाण्याची कोणतही गरज नाही. यंत्रणेने सतर्क राहून उपाययोजना करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी येथे सांगितले. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाबद्दल परिस्थिती मांडताना, राज्य सरकार कोरोनाशी लढताना कमी पडतंय, असे म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील कोरोना परिस्थिती, महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राचे व्हिजन याबद्दल आपलं मत मांडलं. त्यावेळी, राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत असून ज्या ताकदीने कोरोनाशी लढायला हवं, तितक्या ताकदीने राज्य सरकार कोरोनाशी लढत नाही. मुंबईत कोरोनाच्या टेस्ट वाढवायला हव्या, पण टेस्टही वाढविण्यात येत नाहीत, देशात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर महाराष्ट्रात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत मदभेदाबद्दल आणि सरकारच्या 5 वर्षीय कालखंडाबाबत फडणवीस यांनी राज्य सरकारला चिमटा काढला. या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती आहे, हेच कळत नाही. हे सरकार लिव्ह इन-रिलेशनमध्ये आहे, कुटुंब नाही, त्यामुळे सरकार टिकेल असं वाटत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सातत्याने मुख्यमंत्र्यांना प्रत्र लिहून राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर होण्याचं सांगत आहेत. नुकतेच, मराठा समाज्याच्या आरक्षण प्रश्नावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुनावणी होईपर्यंत नव्या नियुक्त्या थांबवण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील सुनावणीसाठी 25 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरची तारीखही दिली. यानंतर हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यानंतर, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
 

Read in English

Web Title: 'Mahavikas Aghadi government in live-in relationship, I don't think it will last for 5 years', devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.