Join us

Maharashtra Cabinet Expansion Live : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्व मंत्री व राज्यमंत्र्यांची बैठक पार पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 7:35 AM

महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील  शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ...

30 Dec, 19 05:49 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्व मंत्री व राज्यमंत्री यांची मंत्री परिषद आज मंत्रालयात पार पडली.

30 Dec, 19 05:12 PM

जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी असलेले आदित्य, प्राजक्त, अदिती मंत्रीपदी विराजमान

मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून युतीच्या काळात मंत्री असणाऱ्या अनेक नेत्यांना डच्चू देखील मिळाला आहे. तर पहिल्यांदा सभागृहात दाखल झालेल्या रोहित पवार, आदित्य ठाकरेअदिती तटकरे, देवेंद्र भुयार, संदीप क्षीरसागर आणि प्राजक्त तनपुरे यांच्यापैकी अदिती, आदित्य आणि प्राजक्त यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. 

30 Dec, 19 09:21 AM

अजित पवार होणार उपमुख्यमंत्री, ठाकरे सरकारमध्ये 25 कॅबिनेट मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांनी गेल्याच महिन्यात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सव्वा महिन्यात अजित पवार दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

30 Dec, 19 04:11 PM

अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते?

खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादीची संध्याकाळी बैठक होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते दिले जाण्याची शक्यता आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा, जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण आणि धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय खाते देण्यात येणार आहे. याशिवाय,  अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 

30 Dec, 19 03:42 PM

मुंबई : खातेवाटपाबाबत संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. 

30 Dec, 19 02:36 PM

गोरगरिब दिव्यांगाचा वाली मंत्रिमंडळात, बच्चू कडूंनी घेतली शपथ

आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून बच्चू कडूंना मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा वाद सुरू असतानाचा कडू यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता. 

30 Dec, 19 02:06 PM

राज्यपाल पुन्हा चिडले, काँग्रेस नेत्याला 'दुसऱ्यांदा' दिली शपथ

अक्कलकुवा मतदारसंघातील काँग्रेस नेते अॅड केसी पाडवी यांच्या शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चिडल्याचे पाहायला मिळाले. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर पाडवींनी थोडक्यात मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना बोलावून दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली. ठरवून दिलेल्या मजकूराव्यतिरिक्त काहीही बोलायचं नाही, असेही कोश्यारी यांनी ठणकावून सांगितले.   

30 Dec, 19 02:18 PM

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ


 

30 Dec, 19 01:55 PM

काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी घेतली शपथ, मराठवाड्याला स्थान

30 Dec, 19 01:15 PM

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा Live :

30 Dec, 19 01:07 PM

अजित पवार यांनी घेतली शपथ, उपमुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ठाकरे सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा आणि त्यांच्या राजकीय कार्यकाळात तिसऱ्यांदा अजित पवारांना  उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. 

30 Dec, 19 11:39 AM

मंत्रिपद नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त, काँग्रेसचा फलक जाळला

पुणे - काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना मंत्रिपद नाकारल्याने भोरमध्ये काँग्रेस समर्थकांची नाराजी, काँग्रेसचा फलक जाळला. 

30 Dec, 19 11:14 AM

अपक्ष आमदार बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांसाठी गोड बातमी, मंत्रिमंडळात वर्णी

अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद देण्यात येणार आहे. प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगांच्या प्रश्नासाठी लढणार नेता म्हणून बच्चू कडूंकडे पाहिले जाते. तसेच, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नेहमीच हुज्जत घालणारा आमदार म्हणूनही त्यांची  ओळख आहे.  

30 Dec, 19 11:10 AM

राजू शेट्टी महाविकास आघाडीवर नाराज, मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर राहणार

30 Dec, 19 09:01 AM

अखेरीस 'वर्षा' गायकवाड मंत्रिमंडळात, काँग्रेसनं पुन्हा दिली संधी

काँगेसचा बालेकिल्ला असलेल्या धारावी मतदारसंघातील आमदार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. यंदा सगल चौथ्यांदा विजय मिळवत वर्षा यांनी आपली आमदारकी कायम ठेवली आहे. त्यामुळे, काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. यापूर्वी त्यांनी महिला व बालकल्याणमंत्रीपद सांभाळले होते. 

30 Dec, 19 08:28 AM

काँग्रेस नेत्यांची यादी, 10 आमदार घेणार शपथ

30 Dec, 19 07:39 AM

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेच्या या नेत्यांना संधी, तानाजी सावंत यांचा पत्ता कट

१) अनिल परब
२) उदय सामंत 
३) गुलाबराव पाटील
४) शंभूराजे देसाई
५) दादा भुसे 
६) संजय राठोड 
७) अब्दुल सत्तार 
८) राजेंद्र पाटील यड्रावकर
९) शंकरराव गडाख 
१०) बच्चू कडू
११) संदीपन भुमरे

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेमंत्रीभगत सिंह कोश्यारी