मुंबई : गेल्या काही वर्षांत कर्तव्य बजावताना महावितरण कंपनीच्या १७०० कर्मचाºयांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या वारसांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर महावितरणच्या सेवेत रूजू करणे अपेक्षित होते. मात्र, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांना बढतीच दिली जात नसल्याने या वारसांना रूजू करून घेण्यासाठी जागा रिक्त होत नसल्याची माहिती हाती आली आहे. या धोरणामुळे वारसांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.सरकारी सेवेत असलेल्या कोणत्याही कर्मचाºयाचा कामावर असताना मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला योग्यतेनुसार नोकरी देण्याचे धोरण असून महावितरण कंपनीलाही ते लागू आहे. गेल्या काही वर्षांत महावितरण कंपनीच्या १७०० कर्मचाºयांचा आॅन ड्युटी मृत्यू झाला. त्यापैकी १३०० कर्मचारी हे शिपाई आणि वायरमन या पदांवर काम करणारे होते. जोखमीचे काम करताना त्यापैकी अनेकांनी जीव गमावलेला आहे. त्यांचे वारसदार अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाºयांकडे सातत्याने विनवणी करत आहेत. मात्र, तुमची नावे वेटिंग लिस्टवर असल्याचे सांगत या वारसांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे या मृत कर्मचाºयांच्या कुटुंबायांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेने केला आहे. जागा रिक्त होत नसतील तर विशेष पदांना मंजूरी घ्या. परंतु, अनुकंपा तत्त्वावरील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना न्याय द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. ही भरती तातडीने झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिल्याची माहती कार्याध्यक्ष राकेश जाधव यांनी दिली.बढती रोखून भरतीत जाणिवपूर्वक अडथळाचतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना बढती मिळाली तर त्यांच्या जागा रिक्त होतील आणि त्या जागांवर अनुकंपा तत्वावरील वारसदारांची भरती शक्य होईल. परंतु, ही भरती होऊ नये यासाठी त्यांना बढती दिली जात नाही.त्यात महावितरणच्या काही परप्रांतीय अधिकाºयांचे हितसंबंध गुंतल्याचा आरोप मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष शिरीष सावंत, कार्याध्यक्ष राकेश जाधव यांनी केला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, वेटिंग लिस्टनुसार अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांची भरती होत असते असेही त्यांनी नमूद केले.
महावितरणची अनुकंपा भरती वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 1:47 AM