महावितरणची हेल्पलाइन ‘हेल्प’लेस

By admin | Published: November 13, 2014 10:41 PM2014-11-13T22:41:46+5:302014-11-13T22:41:46+5:30

वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण जलदगतीने व्हावे यासाठी वीज महावितरणने हेल्पलाइन सुरू केली आहे.

Mahavitaran's helpline 'help'lls | महावितरणची हेल्पलाइन ‘हेल्प’लेस

महावितरणची हेल्पलाइन ‘हेल्प’लेस

Next
प्रशांत शेडगे - पनवेल
वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण जलदगतीने व्हावे यासाठी वीज महावितरणने हेल्पलाइन सुरू केली आहे. मात्र याठिकाणी तक्रार नोंदविण्याची पध्दत अत्यंत क्लिष्ट असल्याने ग्राहक स्थानिक वितरण कार्यालयातच थेट संपर्क साधतात. त्यामुळे महावितरणची हेल्पलाइन ग्राहकांसाठी ‘हेल्प’लेस ठरत आहे. 
वीज ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविल्यास प्रत्येक तक्रार संबंधितांर्पयत  पोहचवणो, काही त्रुटी आढळल्यास त्या पूर्ण करणो, तक्रारीच्या निवारणाबाबत खातरजमा करता यावी याकरिता ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. 
महावितरणने भांडुप परिमंडळातील सर्व वीज ग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. वीज ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी 18क्क् 233 3435 आणि 18क्क् 2क्क् 3435 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी आणि स्थानिक फ्युज कॉल सेंटर्सऐवजी टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मात्र तक्रारीसाठी ग्राहकांना आपला बाराअंकी वीज  ग्राहक क्रमांक नोंदविणो क्रमप्राप्त आहे. 
ग्राहकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी ती अतिशय क्लिष्ट आहे. शिवाय मीटर क्रमांक अनेकदा लक्षात नाही. त्यामुळे स्थानिक कार्यालयात संपर्क साधणो सोयीचे ठरत असल्याचे ग्राहकांचे म्हणणो आहे. त्यामुळे हेल्पलाइनवर टोल फ्री क्रमांकाऐवजी विभागीय कार्यालयाचा क्रमांक दिल्यास तक्रारीचे लवकर निवारण होईल, असेही परिसरातील ग्राहकांना वाटते. (प्रतिनिधी)
 
बिघाड पनवेलला; तक्रार भांडुपला
1विजेचा बिघाड पनवेलला होतो आणि तक्रार थेट भांडुपला करावी लागते ही गोष्ट ग्राहकांना खटकते. ग्राहक सेवा केंद्रात तक्रार केल्यानंतर त्याला सर्व माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर विभाग, उपविभाग आणि कनिष्ठ अभियंता कार्यालय कोणते आहे ते शोधावे लागते. मग तक्रार नोंदणी होऊन कर्मचारी कामाला लागतात. तोर्पयत बराच वेळ खर्ची पडतो, परिणामी ग्राहकाला ताटकळत बसावे लागते.
 
टोलफ्रीवर टोलवाटोलवी
2एक तर टोलफ्री मोठा असल्याने तो लक्षात राहात नाही. त्याचबरोबर ग्राहक क्रमांक शोधण्यासाठी वीज बिलाची शोधाशोध करावी लागते. वीज खंडित झाल्यानंतर संबंधित हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर हा पर्याय निवडा, हा नंबर दाबा असे सांगितले जाते. त्यानंतर प्रतिनिधीही लवकर फोन उचलत नाहीत, फोन उचलल्यानंतर काय बोलतात ते समजत नाही. त्याचबरोबर तक्रार दिल्यानंतर त्याचे काय झाले,हे समजत नाही. खंडित वीज पुन्हा येणार कधी, काय फॉल्ट आहे याची माहिती ग्राहकांना मिळत नाही, अनेकदा टोलवाटोलवी केली जात आहे.
 
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील ग्राहकांकडून वीज मंडळाच्या हेल्पलाइनचा अधिक वापर केला जातो. त्यानुसार ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केले जाते. ब:याचदा स्थानिक कर्मचा:यांकडूनही वीज वितरणसंदर्भातील त्रुटी त्वरित दूर करण्यासाठी प्रय} केले जातात.
- दिलीप मेहेत्रे,कार्यकारी अभियंता, महावितरण पनवेल
 
कळंबोलीकर सर्वाधिक त्रस्त
3कळंबोलीला तळोजा उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात असून ही वाहिनी आणि पोल जुनाट झाले आहेत. अनेकदा बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो. तीन तीन तास बत्ती गुल होते. ही समस्या नित्याची झाल्याने कळंबोलीत वीज ग्राहक हेल्पलाइनवर फोन करतात मात्र कधीही इत्यंभूत माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे. महावितरणच्या कार्यालयात गेल्यानंतर थोडीफार माहिती उपलब्ध होत असे वीज ग्राहकांनी सांगितले.

 

Web Title: Mahavitaran's helpline 'help'lls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.