Join us

महावितरणचे नवे सब स्टेशन कार्यान्वित; १३ हजार ९०० ग्राहकांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:36 AM

महावितरणच्या वसई मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कामन परिसरातील पोमन (ता. वसई) येथे २२/२२ केव्ही स्विचिंग सब स्टेशन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले.

मुंबई : महावितरणच्या वसई मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कामन परिसरातील पोमन (ता. वसई) येथे २२/२२ केव्ही स्विचिंग सब स्टेशन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे वसई मंडळ कार्यालय अंतर्गत येणाºया १३ हजार ९०० ग्राहकांना फायदा होणार आहे.कामन परिसरास यापूर्वी वसई येथील महापारेषणच्या १००/२२ केव्ही सबस्टेशनमधून वीजपुरवठा केला जात होता. वाढत्या विजेच्या मागणीमुळे यंत्रणेवरील ताण वाढत होता. पूर्वीच्या वीज वाहिनीची लांबी सुमारे ७५ किमी होती. त्यामुळे शेवटच्या ग्राहकांना अपवादात्मक परिस्थितीत अडचणींचा सामना करावा लागत असे. आता सुमारे ७.९ कोटी रुपये खर्च करून ‘दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनें’तर्गत पोमन सबस्टेशनचे काम केले आहे. सबस्टेशनमुळे कामन परिसरातील वीज ग्राहकांना योग्य दाबाने विना व्यत्यय वीजपुरवठा करणे शक्य होईल.वाढत्या विकासामुळे या भागाची विजेची वाढती गरज सरासरी २१ टक्के आहे. नवीन सब स्टेशनमुळे सुमारे ४.५ कोटींचा महसूल देणाºया घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांची ही गरज विनाव्यत्यय पूर्ण करणे शक्य होणार आहे.पोमन स्विचिंग सब स्टेशनला महापारेषणच्या नालासोपारा व वसई या अतिउच्चदाब केंद्रांतून वीजपुरवठा केला आहे. यामुळे एका केंद्रातील पुरवठ्यात अडचण आल्यास दुसºया केंद्रावरून पुरवठा करता येईल. पोमन केंद्रातून चार फिडरने वीजपुरवठा केला जाईल. एकाच फिडरवरील ग्राहक चार फिडरवर विभागल्यामुळे चांगला वीजपुरवठा होईल. पोमन सब स्टेशन येथे अतिरिक्त दोन फिडर भविष्यातील वाढती वीज मागणी गृहीत धरून उभे करण्यात आले आहेत.>अतिउच्चदाब केंद्राचा ताण कामीपोमन येथील २२/२२ केव्ही स्विचिंग सब स्टेशनमुळे अडचणी सुटल्या असून नव्या वीज वाहिनीची लांबी १९ किमी कमी झाली आहे. पोमण २२/२२ केव्ही स्विचिंग सब स्टेशनमुळे महापारेषणच्या वसई येथील अतिउच्चदाब केंद्रावरील ताणही कमी झाला आहे.पोमन औद्योगिक वसाहत, कामन, कोल्ही, खिंडीपाडा, बापाने, चिंचोटी गाव, देवदल सागपाडा, आयेशा कम्पाउंड, पटेल इंडस्ट्रीयल इस्टेट, शिलोत्तर, नागळे, महाजनपाडा, डोंगरीपाडा, मोरी, पोमन, भेंडीपाडा, कामन रेल्वे स्टेशन, बेबीपाडा गाव या परिसरास चांगला वीजपुरवठा देणे शक्य होणार आहे.