मुंबई : ऊर्जा संवर्धनासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रलयाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन-2क्14च्या प्रथम राष्ट्रीय पुरस्कारासाठी महावितरणची निवड केली आहे. 14 डिसेंबर हा दिवस देशात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. महावितरणच्या वतीने संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे हे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
महावितरणने गावठाणासाठी स्वतंत्र फिडर्स व सिंगल फेजिंगच्या मदतीने सुमारे 3 ते 3 हजार 5क्क् मेगाव्ॉट विजेच्या मागणीचे व्यवस्थापन केले. याशिवाय अनावश्यक विजेचा वापर टाळून वीजबचत करावी, यासाठी महावितरणतर्फे शाळा-कॉलेजमध्ये विशेष अभियान राबविण्यात आले आहे. महावितरणने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन या पुरस्कारासाठी महावितरणची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)