Join us

महावितरणच्या वसुली पथकांमुळे ग्राहक हैराण!

By admin | Published: March 02, 2015 10:41 PM

विद्युत महावितरण खात्यामार्फत विद्युत ग्राहकांना अंतिम दिनांकानंतर देयक रक्कम न भरल्याने वसुली पथकांच्या वीज कनेक्शन खंडित कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत.

रोहा : विद्युत महावितरण खात्यामार्फत विद्युत ग्राहकांना अंतिम दिनांकानंतर देयक रक्कम न भरल्याने वसुली पथकांच्या वीज कनेक्शन खंडित कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत. अनेकदा बिलेच उशिरा येतात, त्यामुळे ती देयके भरण्यासाठी एखादा दिवस मिळत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.बिल न भरल्यास सामान्य नागरिकांचे विजेचे कनेक्शन लगेच तोडण्यात येते. मात्र बड्यांसाठी अ‍ॅडजेस्टमेंट फॉर्म्युला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी केला आहे. तर वीजवितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेवून चौकशी अपेक्षित असल्याचे सामान्य ग्राहकांचे मत आहे.रोह्यातील वीज ग्राहकांनी वीज वसुली पथकाचा मोठा धसका घेतला असून वीज देयकाची अंतिम तारीख उलटताच विद्युत कनेक्शन खंडित करण्याचा तगादा लावला जातोय? अथवा वीज वसुली पथकांमार्फत विद्युत कनेक्शन खंडित करण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. दरमहा येणारे विद्युत बिल बहुतांश वेळा भरणा दिनांक उलटल्यानंतर किंवा एक दोन दिवस आदी ग्राहकांच्या हाती पडते. त्यामुळे बिलातील अतिरिक्त भाडे ग्राहकांना सोसावे लागत आहे. धाटाव परिसरात वीज वसुली पथक कारवाईसाठी आल्यास दरम्यान विद्युत ग्राहकाने वीज बिलाची रक्कम हातात दिल्यास भरलेल्या रकमेची पावती दोन दिवसांत मिळेल, असे सांगितल्याचे उदाहरण आहे. वादळामुळे वीज वाहन्यांवर पडलेली झाडे अथवा वाकलेले पोल काढण्यासाठी उपयोगात येणाऱ्या क्रेन मालकालाही अशा कारवाईस सामोरे जावे लागल्यामुळे वसुली पथकाच्या कारवाईबाबत नाराजी आहे. पावती न देणारे असे वसुली पथक अधिकृत आहेत का? वीज कनेक्शन कट केल्यानंतर वीज जोडणीसाठी तोंडी चार्ज सांगितला जातो. त्या पावतीबाबत उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना मिळत आहेत. याची गंभीर दखल अधिकारी घेतील का? असा सवाल ग्राहकांकडून होत आहे. ग्रामीण भागातून अनेक ठिकाणी नादुरुस्त पोल, लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या याबाबत बदलण्यासाठी ग्रामस्थांनी अथवा वीज ग्राहकांनी सूचना केल्यास अनेक अडचणी सांगितल्या जातात. अनेक ठिकाणी आदिवासीवाडी, स्मशानभूमी मार्ग, गावचे मंदिरे यांच्या कनेक्शनसाठी अनेक कारणांचा ससेमिरा समोर ठेवला जातो. मात्र एखाद्या व्यावसायिकाला थ्रीफेज कनेक्शन हवे असल्यास सर्व नियम बाजूला ठेवून अडचणी दूर करुन तत्काळ दिले जाते हे अनेकदा समोर आले आहे. (वार्ताहर)व्यावसायिकांवर मेहेरबानी४ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नादुरुस्त पोल, लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी वीज ग्राहकांनी सूचना केल्यास अनेक अडचणी सांगितल्या जातात. अनेक ठिकाणी आदिवासीवाडी, स्मशानभूमी मार्ग, गावची मंदिरे यांच्या कनेक्शनसाठी अनेक कारणांचा ससेमिरा समोर ठेवला जातो. मात्र एखाद्या व्यावसायिकाला थ्रीफेज कनेक्शन हवे असल्यास तत्काळ दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.