Join us

महामुंबईत रक्तदानाचा महायज्ञ सुरूच, रक्तदाते जपताहेत रक्ताचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:05 AM

मुंबई : ‘लोकमत’च्या वतीने 'लोकमत - रक्ताचं नातं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

मुंबई : ‘लोकमत’च्या वतीने 'लोकमत - रक्ताचं नातं' या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाच्या उपचारांत अडचण येऊ नये यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त रक्तसाठा असणे गरजेचे आहे, हेच लक्षात घेत कोरोनाविरुद्धच्या लढाईत रक्तदाते रक्तदानासाठी पुढाकार घेऊन आपले मोलाचे योगदान देत आहेत.

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिराची ठिकाणे

तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

१५ जुलै - दादर (पश्चिम) : अखिल भारतीय कीर्तन संस्था, मुंबई डबेवाला संघटना, ज्ञानदा प्रबोधन संस्था, सचिन शिंदे - मुंबई भाजप सचिव / श्री विठ्ठल मंदिर सभागृह, डी. एल. वैद्य मार्ग, दादर पश्चिम / स. ११ ते सायंकाळी ५.

१५ जुलै - पेण डोलवी : ‘लोकमत’ आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, डोलवी यांच्यातर्फे / संजीवनी हॉस्पिटल जेएसडब्ल्यू डोलवी, पेण / स. ९.३० ते सायंकाळी ६.

---------------------

१६ जुलै - डोंबिवली पूर्व - पंढरीनाथ म्हात्रे, भाजप उपाध्यक्ष, डोंबिवली शहर पूर्व मंडळ / पहिला मजला, स्वामी नारायण हॉल, गांधीनगर, डोंबिवली पूर्व / स. ९ ते दु. २

--------------

येथे संपर्क साधा

'लोकमत'च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा http://bit.ly/lokmatblooddonation

-------------------------------------