उमेदवारीवरून महायुतीत चढाओढ

By admin | Published: June 30, 2014 12:27 AM2014-06-30T00:27:56+5:302014-06-30T00:27:56+5:30

199क् ते 2क्क्4 सालार्पयत सलग चारवेळा भारतीय जनता पार्टीने मुंबादेवी विधानसभेवर भगवा फडकवून आपले वर्चस्व सिद्ध केले.

Mahayuti bout from the candidature | उमेदवारीवरून महायुतीत चढाओढ

उमेदवारीवरून महायुतीत चढाओढ

Next
>चेतन ननावरे - मुंबई
199क् ते 2क्क्4 सालार्पयत सलग चारवेळा भारतीय जनता पार्टीने मुंबादेवी विधानसभेवर भगवा फडकवून आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र 2क्क्9 सालच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेच्या पारडय़ात पडली आणि महायुतीला आघाडीकरून या ठिकाणी दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीसमोर विजयात सातत्य राखण्याचे आव्हान असेल. तर महायुतीतील सेना-भाजपामध्ये मात्र ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याची चर्चा आहे.
सध्या काँग्रेसचे अमीन पटेल या ठिकाणी आमदार म्हणून कार्यरत आहेत. येथे हिंदू आणि मुस्लीम मतदारांची संख्या जवळपास समसमान आहे. येथील गल्ल्यागल्ल्यांच्या आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात स्थानिक आमदार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विरोधक करतात.
2क्क्9 सालच्या विधानसभा निवडणुकीत आमदार अमीन पटेल यांनी शिवसेनेच्या अनिल पडवळ यांचा सुमारे 18 हजार मतांनी पराभव केला होता. त्याआधी सलग चार टर्म भाजपाचे राज पुरोहित यांनी या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येण्याची किमया करून दाखवली आहे. मात्र गेल्यावेळी मतदारसंघात झालेल्या बदलामध्ये शिवसेनेच्या उमेदवारावर मात करीत आघाडी सरकारने या ठिकाणी बाजी मारली. त्यात एकूण मतांच्या 46.83 टक्के इतकी मते मिळवत पटेल यांनी एकहाती विजय मिळवला होता. आघाडी आणि महायुतीवगळता येथे समाजवादी पार्टीचेही ब:यापैकी वर्चस्व आहे. 2क्क्9 सालच्या निवडणुकीत सपाच्या बशीर पटेल यांना 19 हजार 936 मते मिळाली होती. सध्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात मोडणा:या सहा महापालिका प्रभागांपैकी चार प्रभागांत आघाडीचे, तर प्रत्येकी एका प्रभागात महायुती आणि सपाचा नगरसेवक आहे. चार टर्म भाजपाने सत्ता गाजवलेला मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याने महायुतीचा पराभव झाल्याची टीका भाजपमधून होत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी या विधानसभा मतदरासंघात मात्र आघाडी घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपाला सोडावा, अशी मागणी भाजपाच्या गोटातून होत आहे.
 
मराठी मतदार नाराज
भेंडी बाजारातील मुस्लीम मतांवर डोळा ठेवून पटेल यांनी त्यांचे पुनर्वसन माझगांवमध्ये केल्याचा आरोप विरोधकांमधून केला जात आहे. याउलट नळ बाजार, उमरखाडी आणि मराठीबहुल परिसरातील इमारतींचे पुनर्वसन अजूनही रखडलेले आहे. त्यामुळे मराठी मतदारांमधून पटेल यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 
महायुतीला नाराजीची भीती
शिवसेनेमधून सध्यातरी या ठिकाणी पटेल यांच्याविरोधात कोणाला उभे करायचे, यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र ही जागा पदरात पडल्यास भाजपातर्फे महाराष्ट्र प्रवक्ते अतुल शहा यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे भाजपाला जागा सोडल्यास शिवसैनिकांत आणि सेनेला जागा दिल्यास भाजपा कार्यकत्र्यात नाराजी पसरण्याची भीती आहे. त्याचा थेट फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.
 
भेंडी बाजार तारणार का?
मोठय़ा संख्येने असलेल्या जुन्या इमारतींमधील सर्वाधिक इमारती असलेला भेंडी बाजार म्हणजेच चोर बाजार हा परिसर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात मोडतो. येथील धोकादायक इमारतींत राहणा:या रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर माझगाव येथील म्हाडा संकुलात करण्यात आले. त्यामुळे येथील काय ती मते तरी पटेल यांना मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Mahayuti bout from the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.