लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 06:13 AM2024-01-04T06:13:14+5:302024-01-04T06:16:06+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.

Mahayuti plans joint strategy for Lok Sabha, joint gatherings with 11 allies on Sankranti | लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे

लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे

मुंबई : महायुतीतील तीन पक्षांचे आधीच मनोमीलन झाले, सरकारमध्येही तिघे व्यवस्थित बसले; पण आता गावोगावचे कार्यकर्ते, नेते यांचे मनोमिलन घडविले जाणार आहे. महायुतीतील ११ मित्रपक्षांचे संयुक्त मेळावे १४ जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी होणार आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. जिल्हा, तालुका,  बुथस्तरापाठोपाठ विभागीय मेळावे होतील. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मार्गदर्शन करतील, असे ते म्हणाले.

महायुती राज्यात ४५+ जागा जिंकणार 
राज्यभर दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पुन्हा एकदा दिसत आहे. महायुती राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकेल. आम्ही किमान ५१ टक्के मते मिळवू, असा दावा बावनकुळे यांनी केला. तिन्ही पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जातील, असे खा. तटकरे म्हणाले.

तळागाळापर्यंत पोहाेचणार
शिवसेना नेते दादा भुसे म्हणाले, मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महायुती’च्या घटक पक्षांचे मेळावे होणार आहेत. 
 

Web Title: Mahayuti plans joint strategy for Lok Sabha, joint gatherings with 11 allies on Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.