महायुती-आघाडीपैकी बाजी कुणाची?

By admin | Published: April 15, 2015 10:53 PM2015-04-15T22:53:42+5:302015-04-15T22:53:42+5:30

महापालिका स्थायी समिती सभापतीपदासह प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता होणार असून स्थायी समिती सभापतीपदासाठी युती व आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे.

Mahayuti-Who's the best bet? | महायुती-आघाडीपैकी बाजी कुणाची?

महायुती-आघाडीपैकी बाजी कुणाची?

Next

सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासह प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता होणार असून स्थायी समिती सभापतीपदासाठी युती व आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. विरोधी व सत्ताधारी पक्षांकडे समसमान सदस्य असल्याने कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी समितीमध्ये सेनेचे- ४, भाजपा- ३, रिपाइं- १, राष्ट्रवादी पक्ष- ४, काँग्रेस पक्ष- २ व साई पक्ष- २ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी युती व आघाडीकडे समसमान ८-८ सदस्य असून युतीतील रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव यांना खेचण्यासाठी आघाडीकडून शर्थीचे प्रयत्न होत आहेत. उपमहापौर निवडणुकीत भगवान भालेराव यांनी पक्षाच्या पंचशीला पवार यांना मतदान न करता आघाडीचे राजेश वधारिया यांना मतदान केले होते.
सत्ताधारी पक्षातील साई पक्ष विरोधी गटात बसल्याने युती अल्पमतात आली आहे. प्रभाग क्र.-१ समितीमध्ये युती व विरोधी पक्षांचे समसमान सदस्य असल्याने रिपाइंचे नगरसेवक यांच्यावरच सभापतीपदाचे भविष्य अवलंबून आहे. प्रभाग क्र.-२ समितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार आहे. तर प्रभाग क्र.-३ व ४ मध्ये युतीच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने युतीचा सभापती निवडून येणार आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व साई पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवक ऐन वेळी गैरहजर राहिल्याने शिवसेनेच्या अपेक्षा पाटील व रिपाइंच्या पंचशीला पवार महापौर-उपमहापौरपदी निवडून आल्या आहेत. पालिकेत युती अल्पमतात आली असून अंतर्गत फुटीचा फायदा राष्ट्रवादी पक्षाने घेतला आहे. प्रत्येक महासभेत सेना-भाजपाची कोंडी केली जात आहे. युतीतील अंतर्गत करारनाम्यानुसार स्थायी समिती सभापतीपद भाजपाच्या वाट्याला गेले असून राम चार्ली व जया माखिजा हे सभापतीच्या शर्यतीत आहेत. युतीला जयमहाराष्ट्र करून आघाडीत गेलेल्या साई पक्षाने स्थायी सभापतीपदाची गळ वरिष्ठांकडे घातली आहे. राष्ट्रवादीने ओमी कलानी यांचे नाव पुढे केले आहे.

Web Title: Mahayuti-Who's the best bet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.