मेट्रो स्थानकांवर महिलाराज, राज्यातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके

By सचिन लुंगसे | Published: March 3, 2023 08:17 PM2023-03-03T20:17:47+5:302023-03-03T20:18:57+5:30

स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत ७६ महिला कर्मचारी मेट्रो मार्ग २ अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या स्थानकांचे व्यवस्थापन करणार आहे.

Mahilaraj at metro stations, the first women operated metro stations in the state | मेट्रो स्थानकांवर महिलाराज, राज्यातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके

मेट्रो स्थानकांवर महिलाराज, राज्यातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके

googlenewsNext

मुंबई : एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने मेट्रोमधीलमहिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मुंबईमेट्रोमधील स्थानकांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन महिलांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत ७६ महिला कर्मचारी मेट्रो मार्ग २ अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या स्थानकांचे व्यवस्थापन करणार आहे.

आकुर्ली आणि एक्सर या स्थानकांवरील सर्व महिला कर्मचारी या तीन शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत. ज्यामध्ये स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साइज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी मेट्रो प्रवाशांना मदत करतील. तर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी मेट्रो स्थानकांवरील सुरक्षितता आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करतील.

हा उपक्रम केवळ परिवहन उद्योगातील महिलांच्या क्षमता अधोरेखित करणारा नसून इतर महिलांना या क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रेरीत करणारा ठरेल. मेट्रोमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासोबत त्यांच्यासाठी कपडे बदलण्याची स्वतंत्र व्यवस्थादेखील केली आहे. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र मेट्रोचे डबे, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि टोल फ्री मदत क्रमांक देण्यात आला आहे.

विविध विभागात कार्यरत

मेट्रोच्या कार्यान्वयनासाठी सुमारे २७ टक्के म्हणजे ९५८ महिला कर्माऱ्यांचा समावेश असून ते देखभाल आणि दुरुस्ती, एचआर, वित्त आणि प्रशासन या विभागात कार्यरत आहेत. ज्यामधील बरेचसे कर्मचारी हे बाह्यासेवेमार्फत घेण्यात आले आहेत.

Web Title: Mahilaraj at metro stations, the first women operated metro stations in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.