"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:23 PM2024-10-26T14:23:26+5:302024-10-26T14:28:47+5:30

अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे

Mahim Assembly Constituency Amit Thackeray candidature is seen to have created a difference in the Mahayuti | "अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."

"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."

Mahayuti on Amit Thackeray :माहीम दादर विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांच्यासमोर विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे तगडं आव्हान असणार आहे. अशातच आता अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांना निवडून आणावं असं भाजपचे म्हणणं आहे तर सदा सरवणकरांबाबत मुख्यंमत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं शिवसेना शिंदे गटाने म्हटलं आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे आव्हान अमित ठाकरेंसमोर आहे. दुसरीकडे, सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आता अमित ठाकरे यांना महायुतीने समर्थन द्याव असं वाटतं असे विधान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे. महायुतीमध्ये एक नातं आपण जपायला हवे, असेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे,सदा सरवणकरांना डावलणं अयोग्य असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता माहीम मतदारसंघावरुन महायुती नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

"सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. यातून जनतेत एक चांगला संदेश जाईल. हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव मैदानात उतरले असतील तर आपणही नाते जपायला हवे. भले उद्धव ठाकरे यांना वाटत नसेल तरी महायुतीने नाते जपावे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन देऊ असे मला वाटतेय," असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

तसेच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. महायुतीमध्ये एक नाते आपण जपायला हवे असे मला वाटते, असेही शेलार म्हणाले.

सरवणकरांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील  - उदय सामंत

"हा एक मोठा विषय आहे. राज ठाकरेंचे चिरंजीव उभे राहत आहेत म्हणून यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आशिष शेलार हे सगळे घेतील. पण सदा सरवणकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले तिकीट ही वचनबद्धता आहे. सदा सरवणकरांनी पडत्या काळामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे त्यांना डावलणं हे योग्य नाही. या संदर्भातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांना आहेत आणि ते लवकरच निर्णय घेतील," असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Web Title: Mahim Assembly Constituency Amit Thackeray candidature is seen to have created a difference in the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.