कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माहीम, धारावीत चाचणी मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:07 AM2021-02-14T04:07:15+5:302021-02-14T04:07:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईतील प्रमुख हॉटस्पॉट ठरलेल्या जी उत्तर विभागाने बाजी मारली. धारावी पॅटर्नने तर ...

Mahim, Dharavi test campaign intensified to prevent corona infection | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माहीम, धारावीत चाचणी मोहीम तीव्र

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माहीम, धारावीत चाचणी मोहीम तीव्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईतील प्रमुख हॉटस्पॉट ठरलेल्या जी उत्तर विभागाने बाजी मारली. धारावी पॅटर्नने तर संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला. मात्र १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर मुंबईत रुग्णांच्या संख्येत अंशत: वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून माहीम आणि धारावी भागात चाचणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. माहीम परिसरात मोबाईल व्हॅनद्वारे शनिवारी दिवसभर चाचणी करण्यात आली, तर धारावीत सलग तीन दिवस नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

दादर, धारावी आणि माहीम परिसरात असलेला जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. या विभागात मार्च २०२० पासून आतापर्यंत १३ हजार ८१६५ बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी १२ हजार ९७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या २०५ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण व मुख्य बाजारपेठ असल्यामुळे दादर परिसरही सतत गजबजलेले असते. त्यामुळे काेराेना संसर्गाचा धाेका लक्षात घेता माहीम आणि धारावी परिसरात चाचणी शिबिर सुरू आहेत.

धारावीत शांती इमारत, ९० फूट रोड येथे शनिवार ते सोमवार आरटीपीसीआर चाचणी सुरू आहे, तर माहीम परिसरात शनिवारी दिवसभर पितांबरी रोड, संत गाडगे महाराज रोड, भाऊजी कीर मार्ग, संत सावता मार्ग, एलजी रोड, आदी ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे चाचणी करण्यात आली.

परिसर....आज....आतापर्यंत.....डिस्चार्ज.....सक्रिय

दादर....०७.......४९९८....४७३५....९७

धारावी....०५.....३९७०....३६४०....१४

माहीम.....०७....४८४७....४५९९....९४

Web Title: Mahim, Dharavi test campaign intensified to prevent corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.