लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या माहीम यार्ड रिमॉडलिंगचे काम अनेक अडथळे पार करत पूर्ण झाले आहे. या कामामुळे गाड्यांची गती वाढण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे काम जुलै २०२०मध्ये सुरू करण्यात आले होते, वाहतुकीच्या अडचणी आणि मर्यादित साधनांची उपलब्धता असूनही कमी वेळेत हे काम पूर्ण झाले आहे.
माहीम स्टेबलिंग यार्ड रिमॉडलिंगचे काम चार ठिकाणी करण्यात आले. त्यामध्ये ट्रॅकचे स्क्रुइंग, ओव्हरहेड पाइपलाइन पुलाचे स्थलांतर, आरसीसी नलिकांचे स्थान परिवर्तन, तीन पॉइंट आणि एक क्रॉसओवर के डिस्मेंटलिंग आदी कामांचा समावेश होता.
माहीमच्या हार्बर अप दिशाच्या प्लॅटफॉर्मवरील वाहतुकीवर परिणाम होऊ दिला नाही. माहीम यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी एकूण २.४४ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, माहीम स्टेबलिंग यार्ड मध्य रेल्वेच्या ईएमयू रेकला स्थिर करण्यासाठी वापरण्यात येते. सकाळी वांद्रे येथून सीएसएमटीसाठी जाणाऱ्या गाड्या याच यार्डमधून जातात. २०१६ मध्ये नवीन हार्बर सेवा सुरू केल्यानंतर काही काळानंतर स्टेबलिंग मार्गिका वापरात नव्हत्या. जलवाहिनी, नाले, सुरक्षा भिंत हटवने, ट्रॅकला जरुरी कर्व्हेचरकडे फिरविणे यामुळे काम आव्हानात्मक झाले होते. यासोबत ढपरच्या माध्यमातून सफाईदेखील केली.
===Photopath===
080521\img-20210508-wa0006.jpg
===Caption===
माहीम यार्ड