भरत उबाळे - शहापूर
सुमारे 28क्क् फूट उंच किल्ला, घनदाट झाडी हे सगळं न्याहाळत आणि डोंगरकडय़ावरून कोसळणा:या धबधब्यात चिंब भिजण्याचा आनंद घ्यायचा असेल तर शहापूर तालुक्यातील माहुली धबधब्यासारखा दुसरा ब्युटीफुल्ल स्पॉट नाही.
माहुली किल्ल्याच्या आजूबाजूनेही उंच डोंगर आणि हिरवीगार वनराई आहे. मुंबई, ठाणो, पालघर, नाशिक कुठूनही येणा:या पर्यटकांसाठी माहुली धबधबा म्हणजे बेस्ट डेस्टिनेशन. लोकल ट्रेनने जायचे असेल तर आसनगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर बाहेरच माहुलीला जाण्यासाठी रिक्षा मिळतात किंवा एसटी बसेसनेही माहुलीच्या पायथ्यार्पयत जाता येते. रेल्वे स्टेशन ते माहुलीच्या पायथ्यार्पयत सुमारे 5 किमीचे अंतर आहे. खाजगी रिक्षाने गेल्यास 5क् ते 6क् रुपये, तर शेअर रिक्षाने किमान 2क् रुपये भाडय़ात येथे जाता येते. खाजगी वाहनाने जाणा:यांना मुंबई-नाशिक महामार्गावरून आसनगाव हद्दीत प्रवेश केल्यावर 5 किमीचा प्रवास करून डोंगराच्या पायथ्याशी जाता येते. पायथ्यापासून वर पायवाटेने जाताना दिसणारे अनेक पक्षी, झाडे-झुडुपे पाहण्याचा मोह आवरणो अशक्य होते. हा मोह आवरला तर मूळ धबधब्यार्पयत पोहोचण्यासाठी चालत सुमारे अर्धा तास लागतो. तसेच या परिसरातील ग्रामस्थही गाइड करतात, त्यामुळे रस्ता चुकण्याची फारशी भीती नसते. हा भाग तानसा अभयारण्याच्या सीमा क्षेत्रत येत असल्याने ठाणो वन्यजीव विभागाने तो विकसित केला आहे.
धबधब्याखालील प्रवाहात पर्यटक बुडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. परंतु या अपघातांना आळा बसावा म्हणून संरक्षक जाळ्या बांधण्यात आल्याने धबधब्याचा परिसर सुरक्षित झाला आहे. पर्यटकांना राहण्यासाठी येथे एक खाजगी फार्महाऊस आहे. तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभागामार्फत येथे छोटे मोठे
स्टॉल्स, धाबे तयार करण्यात आले आहेत.
च् विशेष म्हणजे बचत गटाच्या महिला हे स्टॉल्स चालवत असून येथे वडापाव, भजी अशा स्नॅक्सबरोबरच आपल्या मागणीनुसार भाजीपोळी, वरण-भात किंवा इतरही जेवणाचे पदार्थ तयार करून मिळतात
च्येथून परतताना माहुली किल्ल्याला भेट दिल्यास शिवकालीन इतिहासाच्या काही खुणा पाहायला मिळतील. तसेच वाटेतच असलेल्या मानस मंदिराला अवश्य भेट द्यावी.