मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात आज, १ जुलैपासून बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्राकानुसार ३० पॅसेंजर आणि २९ मेल, एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आला आहे. पावसाळ्यात दृष्यमानता कमी असल्यामुळे मोटरमनला वेगावर नियंत्रण ठेवावे लागत असले, तरी पावसाळ्यानंतर या गाड्या नियोजित वेगानुसार धावतील, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.सीएसएमटी-गडग एक्स्प्रेस १ जुलैपासून आठवड्यातील सहा दिवस धावेल. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, हावडा-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे सुपरफास्ट गाडीत रुपांतरसोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे रूपांतर सुपरफास्टमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर-कोल्हापूर प्रवासात ६५ मिनिटे, तर कोल्हापूर-सोलापूर प्रवासात १२० मिनिटे वाचणार आहेत. या दोन्ही गाड्यांनी २२१३३/२२१३४ हे नवीन गाडी क्रमांकाने देण्यात आले आहेत.तसेच हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस ५ आॅक्टोबर आणि एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस ६ आॅक्टोबरपासून रद्द करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 12:50 AM