Join us

मेल-एक्स्प्रेसची विनाआरक्षित तिकिटे ‘पेपरलेस’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 5:19 AM

उपनगरीय लोकलमधील तिकिटे ‘पेपरलेस’ करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, मेल-एक्स्प्रेसमधील तिकिटेदेखील मोबाइलवर उपलब्ध करण्याचा निर्णय रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने (क्रिस) निर्णय घेतला होता.

मुंबई : उपनगरीय लोकलमधील तिकिटे ‘पेपरलेस’ करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, मेल-एक्स्प्रेसमधील तिकिटेदेखील मोबाइलवर उपलब्ध करण्याचा निर्णय रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने (क्रिस) निर्णय घेतला होता. सध्या ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून, सप्टेंबरपासूनमेल-एक्स्प्रेसचे विनाआरक्षित तिकिटेदेखील मोबाइलवर उपलब्ध होतील. यूटीएस अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधील जनरल तिकिटे खरेदी करता येतील. अ‍ॅपवर मेल-एक्स्प्रेस तिकिटाची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. ही चाचणी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, सप्टेंबरपासून ही सुविधा मिळण्याची शक्यता असल्याचे रेल्वे सूचना प्रणाली केंद्राचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले.सर्व्हर अद्यायावत यूटीएस अ‍ॅपबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना विविध तक्रारींचा सामना करावा लागत होता. यामुळे यूटीएसअ‍ॅपमधून खात्यातील रक्कम वजा होऊन ही प्रत्यक्षात तिकीट उपलब्ध होत नसे, या तक्रारींबाबत विचारले असता, ४८ तासांपूर्वीसर्व्हर अपडेट करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात अशा तक्रारी उद्भवणार नसून, प्रवाशांना सहजतेने मोबाइल तिकिटांचा वापर करता येईल.

>असे करा यूटीएस अ‍ॅप डाउनलोडप्ले स्टोरवर यूटीएस अ‍ॅप उपलब्ध आहे. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर मोबाइल क्रमांक रजिस्टर करावे. रजिस्टर केल्यानंतर रेल्वे स्थानक आणि आर-वॉलेट दिसतील. कमीत कमी १०० रुपयांपासून रिचार्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यूटीएस अ‍ॅपच्या मदतीने तिकीट खरेदी केल्यास तिकिटावर ५ टक्के सूट देण्यात येत आहे.

टॅग्स :मोबाइलरेल्वे