केईएममध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मेल हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:32 AM2020-08-17T01:32:40+5:302020-08-17T01:32:46+5:30
या प्रकारामुळे वर्षभरात त्याला ५ मोबाइल बदलावे लागले आहेत. त्यानुसार भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत़
मुंबई : केईएम रुग्णालयातील भूलशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाºया ३९ वर्षीय तरुणाचा जीमेल हॅक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे वर्षभरात त्याला ५ मोबाइल बदलावे लागले आहेत. त्यानुसार भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत़
तक्रारीनुसार, त्यांनी नवीन घेतलेल्या मोबाइलमध्ये त्यांच्या जीमेल अकाउंटचा वापर केला. यात वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्याची त्यांना सवय होती. २०१९ मध्ये त्यांच्या मोबाइलमधून परस्पर जीमेल अकाउंट लॉगआउट झाला. त्यात पुन्हा लॉग इन होत नसल्याने त्यांनी याबाबत सुरुवातीला कोल्हापूर येथील करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यापाठोपाठ त्यांनी नवीन मोबाइल घेतला. त्यात दुसºया जीमेल अकाउंटचा वापर केला. मात्र पुन्हा एप्रिल २०२० मध्ये त्यांच्या मोबाइलमधून जीमेल अकाउंट परस्पर लॉगआउट झाला. पुढे अनेक अॅप मोबाइलमध्ये परस्पर डाऊनलोड झाल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांना ते अॅपही डिलीट करता येत नसल्याने चिंतेत भर पडली. अखेर त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यात २ एप्रिल २०१९ ते २५ जुलै २०२० दरम्यान नवीन घेतलेल्या पाच नवीन मोबाइलमध्ये परस्पर कोणीतरी जीमेल आणि रेडिफ मेल अकाउंटचा वापर केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.