मुलांच्या मूत्रपिंडाचे आरोग्य सांभाळा
By admin | Published: March 10, 2016 02:33 AM2016-03-10T02:33:51+5:302016-03-10T02:33:51+5:30
लहान मुलांना किडनीचे आजार जडल्यास त्यांना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. हे टाळण्यासाठी लहान मुलांना किडनी विकार जडू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुंबई : लहान मुलांना किडनीचे आजार जडल्यास त्यांना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. हे टाळण्यासाठी लहान मुलांना किडनी विकार जडू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
१० मार्च हा दिवस जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाची संकल्पना ‘लहान मुलांच्या किडनीचे आरोग्य : लवकर निदान आणि उपाय’ अशी आहे. किडनीचा आजार वाढल्यास त्यामुळे किडनी निकामी होऊ शकते. किडनी निकामी झाल्यास रक्तातील गाळण प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आरोग्याला धोका आहे. किडनी निकामी झाल्यास डायलिसीस अथवा किडनी प्रत्यारोपण हाच पर्याय उरतो. डायलिसीससाठी येणारा खर्च हा सामान्यांना परवडण्यासारखा नसतो, त्यामुळे लवकर निदान आवश्यक असल्याचे अॅपेक्स किडनी फाउंडेशनचे डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले.
वयाच्या ३० वर्षांपर्यंत किडनीचे कार्य हे सामान्यपणे चालू असते. नैसर्गिकरीत्या वयोमानाप्रमाणे किडनीची कार्यक्षमता कमी होत जाते. पण अनुवंशिकतेमुळे, जन्मत: दोष असल्यास किंवा किडनीला इजा झाल्यास लहान वयात किडनीचे आजार होऊ शकतात, असेही तज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)
> किडनीची
कार्यक्षमता किती?
भारतीयांच्या शरीररचनेप्रमाणे किडनीच्या गाळण प्रक्रियेची क्षमता ही ९० ते ११० मिली/प्रति मिनीट इतकी आहे.
तिशीनंतर प्रत्येक १० वर्षांनी म्हणजेच १० मिली / प्रति मिनिट गाळण क्षमता कमी होत जाते.
> लवकर निदान आवश्यक
लहान मुलांना होणारा त्रास ते नीटपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. पोटात दुखणे, लघवीला त्रास होणे हा त्रास लहान मुलांना
वारंवार होत असल्यास दुर्लक्ष करू नये. नेफ्रॉलॉजिस्टकडून तपासणी करून घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
>मूत्रपिंडाच्या
आजाराची कारणे
जन्मत: दोष, अनुवंशिक आजार, संसर्ग, शारीरिक जखम, लघवीत अडथळा
तपासण्या
लघवीची तपासणी, रक्त तपासणी, इमेजिंग स्टडिज, किडनी बायोस्पी