इमारतींची देखभाल आवश्यक...

By Admin | Published: July 19, 2014 12:55 AM2014-07-19T00:55:58+5:302014-07-19T00:55:58+5:30

प्रत्येक ठिकाणारील हवामान हे निरनिराळे असते. आपल्या शहरांतील घरात कायम आर्द्रता जाणवते.

Maintenance of buildings required ... | इमारतींची देखभाल आवश्यक...

इमारतींची देखभाल आवश्यक...

googlenewsNext

प्रत्येक ठिकाणारील हवामान हे निरनिराळे असते. आपल्या शहरांतील घरात कायम आर्द्रता जाणवते. वातावरणातील सतत राहिलेल्या ओलसरपाणामुळे भिंंतींचा रंग उडणे, त्या काळ्या पडणे असे अनेक प्रकार घडतात म्हणून इमारतीची देखभाल अगदी आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीप्रमाणे काळजीपूर्वक आणि सुव्यवस्थित करणे आवश्यक आहे. शेवटी आपण ज्या घरात राहत असतो ते घर हे त्या इमारतीचाच भाग असतो हे विसरुन चालणार नाही. जर इमारत व्यवस्थित आणि सुरक्षित असेल तर आपण ही सुरक्षित राहू.
काही गोष्टींची काळजी घेतल्यास आणि योग्य ती निगा राखल्यास इमारतींचे होणारे नुकसान सहज टाळता येऊ शकते. पावसाळ्यात सगळ्यात जास्त नुकसान होत असते ते म्हणजे इमारतींच्या भिंंतींचे. प्रत्येक परिस्थितीत आपलं संरक्षण करणाऱ्या, इमारतींच्या भिंंतींची योग्य काळजी न घेतल्यास त्या कमकुवत होतात आणि चांगल्या दिसत नाही, ज्यामुळे इमारतींचे दर्शनी रुप बाहेरुन बिगडते. इमारतींच्या दर्शनी रुपाप्रमाणेच भिंंतींच्या अंतर्गत भागासही हे सारे लागू पडत असते. अनेकदा पाणी भिंंतींमध्ये झिरपण्याची शक्यता असते त्यामुळे भिंंतींची आर्द्रता वाढते आणि त्यामुळे भिंंतींना दिलेल््या रंगांचे पापुद्रे निघतात. कधी कधी हा ओलावा भिंंतींमध्ये तसाच टिकून राहतो आणि आतल्या-आत भिंंतींचे नुकसान होतच राहते. यासाठी घ्यावयाची काळजी म्हणजे मुळात घराच्या बांधकामासाठी वापरला जाणारा सिमेंट-काँक्रीट सारखा कच्चा माल हा उत्तम दर्जाचा वापरला जाणे आवश्यक आहे जेणेकरुन पावसाळ्यात झिरपणारे पाणी भिंंतींमध्ये टिकून राहणार नाही आणि भिंंती आर्द्रतायुक्तदेखील राहणार नाहीत. भिंंतींना गेलेल्या तडा किंंवा चिरा योग्यवेळी भरून त्यांची डागडुजी करुन घ्यावी.घराच्या आजू-बाजूला एखादा घसरणीचा भाग किंंवा खड्डा वैगरे असल्यास तो सिमेंटने भरुन घ्यावा जेणेकरुन अपघात टाळता येतील. इमारतीच्या बाह्यभागास तसेच अंर्तभागास देण्यात येणाऱ्या रंगाचे हे काम पावसाळा सुरु होण्याच्या बरेच महिने आधी किंंवा नंतर करुन घेतल््यास त्याचे होणारे नुकसान काही अंशी टळू शकेल.
हल्ली घरांना रंग देण्याआधी मॉईश्चर मीटर यंत्राच्या साहाय्याने भिंंतींची आर्द्रता तपासून मगच त्यावर रंग द्यावा की नाही किंंवा रंग दिल्यास तो कोणत्या प्रकारचा आणि कसा असावा हे निश्चित केले जाते. अशा यंत्रांचा वापर करणे घराच्यादृष्टीने फायद्याचे ठरु शकते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमारतीतील विद्युतप्रवाह होय. भिंंतींना ओल असलेल्या भागांमध्ये विद्युतप्रवाहाच्या वायरींची काळजी घ्यावी, त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी जेणेकरून शॉकसर्कीट किंंवा आगीसारख्या घटना टळू शकतील. आपण ज्या सोसायटीमध्ये किंंवा गृहनिर्माण संस्थेमध्ये राहतो त्या ठिकाणाची पावसाळ्यातील देखभाल आणि स्वच्छता तितकीच महत्त्वाची असते. गृहनिर्माण संस्थेतील किंंवा सोसायटीच्या समितीबरोबरच सोसायटीतील प्रत्येक सभासदाने देखील आपल््या या जबाबदारीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण राहत असलेल्या इमारत किंंवा गृहनिर्माण संस्थेची योग्य प्रकारे काळजी घेतली आणि योग्य केले तर आपले घर देखील बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहू शकते. बऱ्याच वेळा इमारतीच्या गच्चीतून किंंवा भिंंतींतून पाण्याची गळती होते अशा तक्रारी सभासद करतात. यावर उपाय म्हणून गृहनिर्माण संस्थेच्या समितीने पावसाळी ऋतूत त्या ठिकाणची तात्पुरती डागडुजी करुन संपूर्ण इमारत दुरुस्तीच्या वेळी अशा गळतींच्या जागांची योग्य ती दुरुस्ती करुन घ्यावी.

Web Title: Maintenance of buildings required ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.