Join us

महापालिकेच्या मरोळ प्रसूतिगृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:14 AM

अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील महानगरपालिकेच्या मरोळ प्रसूतिगृहाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे प्रसूतिगृहाची दुरवस्था झाली आहे.

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील महानगरपालिकेच्या मरोळ प्रसूतिगृहाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे प्रसूतिगृहाची दुरवस्था झाली आहे. त्याचा त्रास रुग्णांसह डॉक्टरांनाही सहन करावा लागत आहे. तसेच प्रसूतिगृहाच्या विविध भागांना टेकंूचा आधार देऊन चलढकल करीत रुग्णांची सेवा केली जात आहे. त्यामुळे रुग्णांसह डॉक्टरांचेही जीव धोक्यात आहेत.महापालिकेचे ५० खाटांचे मरोळ प्रसूतिगृह आहे. अंधेरी पूर्व विधानसभा येथे मनपाचे हे एकमेव प्रसूतिगृह असल्यामुळे चांदिवली, साकीनाका, आरे, पवई, फिल्टरपाडा या आजूबाजूच्या परिसराला ते सोईस्कर असल्याने महिला व नवजात शिशूंची संख्या क्षमतेपेक्षा खूप मोठी असते. एम/एस बी.जे. मेहता आर्किटेक्च्युरल अ‍ॅण्ड स्ट्रक्चरल कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड या स्ट्रक्चरल आॅडिटरने मार्च २०१८ मध्ये सादर केलेल्या अहवालात मरोळ प्रसूतिगृह इमारतीला सी २ बी श्रेणीचा दर्जा दिला होता. परंतु सादर केलेल्या अहवालानुसार, कोणत्याही स्थानांतरणाची गरज नाही; मात्र, मोठ्या रचनात्मक (स्ट्रक्चरल) दुरुस्तीची आवश्यकता आहे, अशी सूचना देण्यात आली होती.प्रसूतिगृहाच्या दुरुस्तीचे काम कागदावरच रखडले असून दररोज मोठ्या संख्येने महिला रुग्णांना व नवजात शिशूंना आपला जीव धोक्यात घालून उपचार घ्यावे लागत आहेत. तसेच मनपा डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनाही जीवाची पर्वा न करता रुग्णांना उपचार द्यावे लागत आहेत. प्रसूतिगृहाच्या सर्वच मजल्यांवर टेकू (प्रोपिंग) करून इमारतीला आधार देण्याचे काम महापालिकेकडून करण्यात आलेआहे.दरम्यान, प्रसूतिगृहाची त्वरित दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केली जावी; अन्यथा मनसे आंदोलन छेडेल, अशाइशारा अंधेरी पूर्व विधानसभेचेमनसे अध्यक्ष रोहन सावंत यांनीदिला आहे.।प्रसूतिगृहाला टेकूचे रिंगणप्रसूतिगृहाच्या तळमजल्यावरील ओपीडी, रजिस्ट्रेशन, लॅब, फार्मासी, आयसीटीसी लॅब, सोनोग्राफी असे अनेक विभाग असून रुग्णांची सर्वाधिक गर्दी असते. मजल्याच्या काही विभाग कक्षातील छत अर्ध्याहून अधिक कोसळलेले आहे. पहिल्या मजल्यावर एएमसी वॉर्ड, लेबर वॉर्ड, एसएनसीयू वॉर्ड आणि ४ लेबर टेबल असून येथे सर्वत्र टेकू (प्रोपिंग) लावण्यात आले आहे. दुसºया मजल्यावर ओ.टी. असून येथेही प्रोपिंग करण्यात आले आहे. तिसºया मजल्यावर पीएमसी वॉर्ड आणि नवजात शिशू तपासणी कक्षालादेखील टेकूचा आधार देण्यात आला आहे. चौथ्या मजल्यावर रुग्णालय कार्यालय, हेल्थ पोस्ट, स्टोर रूम तसेच पाचव्या व सहाव्या मजल्यावर डॉक्टर्स व नर्सेस यांच्या राहण्यासाठी खोल्या असून येथेही प्रोपिंग करण्यात आले आहे.मरोळ प्रसूतिगृहाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तसेच कंत्राटदाराचीही नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, स्थायी समितीची परवानगी आणि आयुक्तांची स्वाक्षरी मिळाली की, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती एका अधिकाºयांनी दिली.