रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 02:48 PM2023-11-19T14:48:01+5:302023-11-19T14:48:20+5:30

अतिक्रमणापोटी २.७२ कोटी दंड वसूल

Major action by Railways 21,736 people arrested | रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक

रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेतीलरेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

२१,७४९ प्रकरणे नोंदवून २१,७३६ व्यक्तींना अटक केली. शिवाय २.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल  करण्यात आला आहे. एप्रिल आणि ऑक्टोबर या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच एप्रिल आणि ऑक्टोबर या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या १७,९६७ प्रकरणांच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे. त्यामुळे रेल्वेची कमाई चांगली झाली आहे.

  एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान मुंबई विभागात ८,६२९ गुन्ह्यांची नोंद झाली असून, एकूण ९४.७७ लाख दंड वसूल करण्यात आला आहे. भुसावळ विभागाने १.१५ कोटीचा दंड वसूल केला. 
  ६,३४९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून ६,३४८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. नागपूर विभागात २,७३४ गुन्हे दाखल करून २,७३१ व्यक्तींना अटक तर २७.६१ लाखांचा दंड वसूल केला. 
  पुणे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने १,८५६ गुन्हे नोंदवत १२.७१ लाख दंड वसूल केला. सोलापूर विभागात २,१८१ गुन्हे नोंदवत २,१७८ व्यक्तींना अटक केली. २१.९२ लाखांचा दंड वसूल केला.

Web Title: Major action by Railways 21,736 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.