Join us

मुकेश अंबांनींना आलेल्या धमकी प्रकरणी मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 2:26 PM

सात दिवसांपासून उद्योगपती मुकेश अंबानी यांना मेलवरुन चारवेळा जीवे मारण्याची धमकी आली होती.

मुंबई: गेल्या सात दिवसांपासून उद्योगपती मुकेश अंबानी यांना मेलवरुन चारवेळा जीवे मारण्याची धमकी आली होती. या प्रकरणी आता मुंबईपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पोलिसांनी तेलंगणातून एका आरोपीला अटक केली आहे, या आरोपीचे नाव गणेश रमेश  वानपारधी (१९) असे आहे.गावदेवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेलदेशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना चौथ्यांदा धमकीचा मेल आला आहे. यावेळी दोन धमकीचे मेल आले आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शादाब खान अशी दिली आहे. मुकेश अंबानींना गेल्या ७ दिवसात ४ वेळा धमक्या आल्या आहेत. या नवीन मेलमध्ये अंबानी यांनी ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पाठवलेल्या ईमेलकडे आणि पैशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला.

काल आलेल्या मेलनंतर पोलिसांनी दिलेली माहिती अशी होती, धमकीचा मेल आला होता तो बेल्जियममधील एका सर्व्हरवरून एकाच ईमेल आयडीवरून दोन ईमेल आले होते. याआधीही मुकेश अंबानी यांना एकाच ईमेल आयडीवरून आणि शादाब खानकडून तीन धमकीचे मेल आले होते. दरम्यान, आता पोलिसांनी मोठी कारवाई करत तेलंगणातून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आता या आरोपीची चौकशी  केली जाणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?

मुंबईमधील प्रमुख उदयोगपती व इतर महत्वाचे व्यक्ती यांना shadabadkhan@mailfence.com या मेल आयडी वरून वेगवेगळ्या दिवशी एकुण ५ धमकीचे इ-मेल आलेले होते, ज्यामध्ये त्यांनी खंडणीची मागणी केलेली होती आणि खंडणीचे पैसे नाही दिले तर त्यांना मारण्याची धमकी दिली होती. सदर बाबत गांवदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र. ३७०/२०२३, कलम ३८७,५०६(२) भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. सदर गुन्हयात केलेल्या तांत्रिक तपासावरून आरोपी राजवीर जगतसिंह खंत, वय - २० वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा.ठी. - कलोल, गांधीनगर, गुजरात यास अटक करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा मुंबई हे करीत आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीपोलिसमुंबई