मुंबई : स्मशानातील कोळसा, राख यांच्यासह फक्त औषधाने गर्भलिंग, लिंगबदलाचा दावा करणाऱ्या पारनेरच्या मेजर बाबा बबन ठुबेचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केला.बाबाने पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून त्याचा प्रचार व प्रसार करून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याचाठपका मंगळवारी पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. त्यानुसार, पीसीपीएनडीटी अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखलकरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पारनेरच्या कान्हुर पठार येथे मेजर बाबा गेल्या ३० वर्षांपासून फक्त औषधानेच गर्भलिंग तसेच लिंग बदलाचा दावा करत होता. मुले होण्यासाठी औषध देत होता. परदेशातही त्याच्या औषधांमुळे अपत्यप्राप्ती झाल्याचा त्याचा दावा आहे. त्यामध्ये आॅस्टेÑलिया, न्यूझीलँड, अमेरिकेचाही समावेश असून त्यांच्याही नोंदी बाबाच्या हिशोबाच्या वह्यांमध्ये आहेत. मुलगा की मुलगी होणार हेदेखील तो सांगत होता. बाबाच्या दरबारी‘वंशाच्या दिव्या’साठी लोकांच्या रांगा लागत असल्याचा दावा बाबा करत होता. त्यात मुलगी हवी की मुलगा यावर तो औषध देत होता. फक्त गर्भवती महिलेचे नाव आणि गर्भधारणेपूर्वीच्या तारखेवरून मुलगा होणार की मुलगी हे बाबा सांगायचा. त्याच्या मते हे अनुमान ९० टक्के खरे ठरायचे.‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर पीसीपीएनडीटीच्या सदस्यांनी याची दखल घेतली. मंगळवारीनगरमध्ये पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात मेजर बाबाचा मुद्दा सदस्यांनी उचलून धरला. लवकरच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखलकरण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबत तक्रारदार अश्विन भागवत यांच्याकडे काही महत्त्वपूर्ण तपशिलाची मागणी करण्यात आली आहे. ती माहिती प्राप्त होताच, पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पीसीपीएनडीटीचे सदस्य गणेश बोºहाडे यांनी सांगितले. मेजर बाबावर
मेजर बाबावर ‘पीसीपीएनडीटी’अंतर्गत गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 5:07 AM