मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा

By मनोहर कुंभेजकर | Published: November 6, 2023 08:18 PM2023-11-06T20:18:11+5:302023-11-06T20:18:44+5:30

आज जेव्हीएलआर रोडवर रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो लाईन 6 च्या कामासाठी के/पश्चिम विभागाने मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई केली.

Major eviction action at JVLR for Metro Line 6 45 hammering on affected structures |   मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा

  मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा

मुंबई - आज जेव्हीएलआर रोडवर रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो लाईन 6 च्या कामासाठी के/पश्चिम विभागाने मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई केली. ओशिवरा पोलिसांच्या मदतीने मेट्रो लाईन 6 च्या अलाइनमेंटमध्ये येणारे एकूण 45 बाधित बांधकाम निष्कासन करण्यात आले. 50 पोलिस दल, 25 बीएमसी मजूर, 2 जेसीबी, 1 पोकलेनचा वापर करण्यात आला.परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त
डॉ.पृथ्वीराज चौहान यांनी ही कामगिरी केली.

हा प्रकल्प 2019 पासून प्रलंबित होता, 2019 मध्ये पालिकेने परिशिष्ट जारी केले होते आणि अनेक प्राधिकरणांसह न्यायालयीन प्रकरणांमुळे निष्कासन लांबणीवर पडला होता. मेट्रो मार्ग 6 च्या साइटचे काम खोळंबले होते आणि प्रलंबित होते. या बांधकामांमुळे रस्त्याचे कामही अपूर्ण राहिल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एसडब्ल्यूडी मध्ये लिंक मिसिंग झाल्यामुळे ड्रेनेजची मोठी समस्या होती. या  निष्कासनमुळे आता परिसरातील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल कारण एसडब्ल्यूडी आणि रस्ता लवकरच एमएमआरडीए मार्फत बांधला जाणार आहे.

इन्फिनिटी मॉल ते वीरा देसाई हा 36.60 मीटर रुंदीचा डीपी रस्ता रस्ता रुंदीकरणासाठी घेण्यात आला आहे आणि मेट्रो मार्ग 6 च्या कामांद्वारे देखील त्याचा परिणाम झाला आहे. रस्ते आणि एसडब्ल्यूडी बांधणीचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. एकदा हा मार्ग पूर्ण झाल्यावर एसव्ही रोड ते लोखंडवाला आणि जवळपासच्या भागात पूर्व पश्चिम प्रवासासाठी मोठा दिलासा मिळेल असा विश्वास डॉ.पृथ्वीराज चौहान यांनी व्यक्त केला.

Web Title: Major eviction action at JVLR for Metro Line 6 45 hammering on affected structures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई