मुंबईत मोठी दुर्घटना, बहुमजली इमारतीच्या ११व्या मजल्यावर लागली आग, वृद्धाचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:41 IST2025-01-07T09:41:34+5:302025-01-07T09:41:50+5:30
Amdheri Fire News: मुंबईतील अंधेरी येथे एका बहुमजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे इमारतीत भीतीमुळे गोंधळ उडाला.

मुंबईत मोठी दुर्घटना, बहुमजली इमारतीच्या ११व्या मजल्यावर लागली आग, वृद्धाचा होरपळून मृत्यू
मुंबईतील अंधेरी येथे एका बहुमजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे इमारतीत भीतीमुळे गोंधळ उडाला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या सुमारे १० ते १२ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत एका वृद्धासह दोघेजण जखमी झाले होते. पैकी वृद्धाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान, मृत्यू झाला.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना इमारतीमधील एका रहिवाशाने सांगितले की, आग लागल्यानंतर याबाबतची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली होती. १५ मिनिटांमध्ये अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी लवकरच आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. त्यांना अग्निशमन दल आणि स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. आगीच्या कारणांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या आगीच्या घटनेचा अधिक तपास हा पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे.