प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 06:13 AM2020-12-06T06:13:21+5:302020-12-06T06:14:10+5:30
नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता घरात राहून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई : महापरिनिर्वाण दिन व बाबरी मशीद पतन दिनाच्या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबरला मुंबईसह राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी प्रमुख धर्मस्थळे, सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता घरात राहून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. २९ वर्षांपूर्वी ६ डिसेंबरला अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त याच दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी हाेते. मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे त्यावर निर्बंध घातले आहेत. नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्या ठिकाणी गस्त वाढविली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.